'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन

Jason Shah : निर्माता संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही मालिका रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये जेसन आणि मनीषा कोईरालामध्ये एक "रेप सीन' पार पाडला. या सीनबाबत पहिल्यांदाच जेसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 20, 2024, 12:06 PM IST
'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन title=

Jason Shah On Adult Scene With Manisha Koirala: अभिनेता जेसन शाहने अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या पहिल्या स्ट्रीमिंग वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. जेसनने या मालिकेत 'ॲलिस्टर कार्टराईट' ही व्यक्तिरेखा साकारली असून जी नकारात्मक भूमिका आहे. या वेब सीरिजमध्ये कोठा आणि तवायफा तसेच स्वातंत्र्ययुद्धाची कथा मांडण्यात आली आहे. यामध्ये जेसनने कडक इंग्लिश पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

या वेब सीरिजमध्ये जेसनचा एक सीन आहे, ज्यामध्ये त्याला मनीषा कोईराला म्हणजेच 'मल्लिकाजान'सोबत एक अडल्ट रेप सीन शूट करायचा आहे, ज्याबद्दल अभिनेता अलीकडेच मोकळेपणाने बोलला आणि म्हणाला की, तो ॲलिस्टर कार्टराईटचे पात्र विचित्र मानत नाही. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, जेसनने मनीषासोबत चित्रित केलेल्या रेप सीनविषयी बोलताना सांगितले की, तो मला भावनिक किंवा थकवणारा वाटला नाही. पुढे जेसनने सांगितलं की, 'मला ते माझ्यासाठी फारसे भावनिक वाटले नाही'.

ॲडल्ट सीनवर प्रतिक्रिया?

जेसन शाह पुढे बोलताना म्हणाले, 'कारण, त्या क्षणी मला असे वाटले की जणू मी तिच्यासोबत हा रेप सीन शूट करत नाहीये, मला असे वाटले की, मी माझ्या लोकांना हे करण्यास सांगत आहे'. या दृष्टिकोनातून हा सीन करणे त्याच्यासाठी सोपे झाल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय जेसन या वेब सिरीजच्या एपिसोडमध्ये इंद्रेश मलिक म्हणजेच 'उस्तादजी'सोबत एक बोल्ड सीन करताना दिसला होता.  ज्याबद्दल त्याने खुलासा केला की, हा सीन शूट करण्यापूर्वी तो संकोच करत होता.

'उस्तादजी'च्या सीनबद्दल

जेसनने फिल्मीबीट ओटीटीला सांगितले की, तो सीन शूट करणे त्याला खूप अवघड वाटले, पण त्याला भन्साळींवर पूर्ण विश्वास आहे आणि दिग्दर्शक या सीनवर जास्त लक्ष केंद्रित करणार नाही याची खात्री आहे. अभिनेता म्हणाला, 'साहजिकच तसे होते, कारण मी यापूर्वी असे काहीच केले नाही. दुसऱ्या माणसाच्या इतक्या जवळ जाण्यासाठी संकोच सहन करावा लागतो, हा योग्य शब्द आहे. मला ते करायला संकोच वाटत होता, पण मी संजय लीला भन्साळींसोबत काम करत असल्यामुळे मला कामाचं ते समाधानही मिळतं.