आजपर्यंत पतीला सहन करत आले, अचानक हे काय म्हणाली hemangi kavi?

एकमेकांना सहन करत आलो

Updated: Dec 27, 2021, 12:40 PM IST
 आजपर्यंत पतीला सहन करत आले, अचानक हे काय म्हणाली hemangi kavi? title=

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्री चांगलीच सक्रिय असते. 

बऱ्याचदा ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकताच हेमांगीने तिच्या खाजगी आयुष्यातील खास फोटो शेअर केले आहेत. पतीसोबतचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर करत तिने लग्नाचा वाढदिवस साजरा करत असल्याचं सांगितलं आहे. या वाढदिवसानिमित्त तिने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेमांगी पोस्टमध्ये लिहिते, "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा ! 

एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही, कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे.

पुढे ती म्हणाली, "आपल्या संसाराच्या सुरुवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चेंगुस तू खर्चिक असणं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!” असेही तिने म्हटले.