हिमेशसमोर अडचण, पहिली पत्नीही राहणार एकाच बिल्डिंगमध्ये

हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत. 

Updated: May 14, 2018, 08:12 AM IST
हिमेशसमोर अडचण, पहिली पत्नीही राहणार एकाच बिल्डिंगमध्ये

मुंबई :  हिमेशनं टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्न केलं. हिमेश रेशमियाचं हे दुसरं लग्न आहे. सध्या तो हनीमुनसाठी दुबईला गेलाय. पण मुंबईत आल्यावर त्याला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार हिमेश ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्या वरच्या माळ्यावर त्याची पहिली पत्नी कोमलदेखील राहते. त्यामुळे हिमेशच्या लग्नानंतरदेखील त्याची पहिली पत्नी सामान्य व्यवहार ठेवू शकेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याच बिल्डिंगच्या टेरेसवर दोघांच लग्न झाल. पण पहिली पत्नी कोमल यापासून दूर राहिली. हिमेशनं त्याची पहिली पत्नी कोमलबरोबर २२ वर्ष संसार केला आणि मग घटस्फोट घेतला. मागच्या वर्षी जूनमध्ये हिमेशचा घटस्फोट झाला होता. हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत.

कोण आहे सोनिया ?

सोनिया कपूर टीव्हीमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'कैसा ये प्यार है', 'जुगनी चली जलंधर', 'यह बॉस', 'रिमिक्स' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. हिमेश आणि सोनिया मागच्या 10 वर्षांपासून डेट करत होते अशा चर्चा आहेत. तिने आतापर्यंत 'किट्टी पार्टी' (रुखसाना), 'आ गले लग जा' (प्रीति), 'पिया का घर' (श्‍वेता), 'कभी-कभी' (नीलू निगम), 'कुसुम' (नैना बजाज), 'कभी हां कभी ना' (अवंतिका), 'सती...सत्‍य की शक्ति' (सानिका), 'ज़ारा' (ज़ारा), 'रिमिक्‍स' (सोनिया रे), 'परिवार' (संगमित्रा शेरगिल), 'कैसा ये प्‍यार है' (नैना खन्‍ना), 'बाबुल की दुआएं लेती जा' (प्रीति), 'जुगनी चली जलंधर' (मंजीत भल्‍ला), 'नीली आंखें' (नीलू निगम), 'कृष्‍णाबेन खाखरावाला' (मिताली कपूर), 'लव यू जिंदगी' (मिताली कपूर), 'येस बॉस' (मीरा श्रीवास्‍तव), 'जय गणेश' (लक्षमी) और 'जय हनुमान' (मंदोदरी) सीरियल्‍समध्ये काम केलय.