close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हिना खानचे नवे 'भसूडी' गाणे रसिकांच्या भेटीला!

टीव्ही दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या लोकप्रियतेत बीग बॉसनंतर प्रचंड वाढ झाली आहे. 

Updated: Jul 18, 2018, 08:06 AM IST
हिना खानचे नवे 'भसूडी' गाणे रसिकांच्या भेटीला!

मुंबई : टीव्ही दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या लोकप्रियतेत बीग बॉसनंतर प्रचंड वाढ झाली आहे. ये रिश्ता क्या कहेलाता है मधील अक्षराने तिने देशातील घराघरात पोहचवले आणि लोकप्रिय केले. हिना खान सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांना स्वतः बद्दलचे अपडेट्स देत असते. आता हिना चाहत्यांसाठी एक छान सरप्राईज घेऊन आली आहे.

हिना खानचे नवे गाणे लॉन्च

काही दिवसांपूर्वी हिना खानने इंस्टग्रामवर एक नवा म्युझिक व्हि़डिओचा टीझर शेअर केला. आणि पाच दिवसातच गाणे लॉन्च होईल अशी माहिती दिली होती. आता हिना खानचा पहिला म्युझिक व्हिडिओ भसूडी लॉन्च झाला आहे. गाण्यात बीग बॉस मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हिना खानचे भसूडी हे गाणे सोनू ठुकराल यांनी गायले आहे. तर परधानने याला रॅप दिला आहे. गाण्यात डबल डेटिंग करणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यांच्याकडून महागडे गिफ्ट्स घेते आणि संधी मिळताच श्रीमंत माणसासोबत निघून जाते. तेव्हा तिचा प्रियकर तिला बोलतो की, तुला स्वामी ओम सारखा जीवनसाथी मिळेल.

आदर्श सून चालू मुलीच्या भूमिकेत

आठ वर्ष अक्षरा ही भूमिका निभावल्यानंतर हिनाबद्दल आदर्श सूनेची कल्पना प्रेक्षकांच्या मनात तयार झाली आहे. पण आता या व्हिडिओतून हिना वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

म्हणून हिनाचे झाले कास्टिंग

गायक सोनू ठुकराल यांनी सांगितले की, हिना खानला बिग बॉस ११ मुळे हे काम मिळाले. जेव्हा गाण्याचे शूटिंग सुरु होते तेव्हा त्यांची आणि निर्मात्यांची नजर बीग बॉसमधील हिना खानवर गेली. त्याचबरोबर बीग बॉसमधील हिनाचा बोल्ड आणि स्टायलिश अवतार पाहुन आमची टीम काहीशी इंप्रेस झाली. आणि शो संपताच हिनाला अप्रोच करण्यात आले. पंजाबच्या पटियालामध्ये भसूडीचे शूटिंग झाले आहे. हिनाने सांगितले की, शूटिंग दरम्यान मला खूप ताप होता. इतकंच नाही तर पावसामुळे शूटिंग दुसऱ्या जागी शिफ्ट करण्यात आले.

असे पडले भसूडी हे नाव

भसूडी हा शब्द अधिकतर उत्तर प्रदेश विशेष करुन दिल्ली, पंजाबमध्ये वापरला जातो. काम बिघडल्यानंतर हा शब्द वापरला जातो. गायक सोनू ठुकराल यांनी या गाण्याच्या नावाविषयीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, जेव्हा मी गाणे लिहित होता तेव्हा कोणतीही पंचलाईन मिळत नव्हती. तेव्हा माझ्या तोंडातून भसूडी पे असे निघाले. तेव्हा त्यांच्या डोक्यात विचार आला की गाणे या शब्दावर तयार करावे.

पहा भसूडी...