Daisy Irani : सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना

Bollywood Shocking News : कलाकार म्हणून आयुष्य जगताना जगाला फक्त झगमगाट दिसतो. पण, त्यामागे असणारी अंधकारमय दुनिया जाणून घेण्याचा किमान प्रयत्न तरी केला आहे का कधी? 

Updated: Jan 4, 2023, 11:44 AM IST
Daisy Irani : सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना title=
Hindi film insutry daisy irani raped at the age of 6 left her mother ashamed read horrifying incident

Daisy Irani : कलाकारांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी त्यांना मिळणारं यश आणि सरतेशेवटी त्यांना मिळणागा गडगंज पैसा पाहून अनेकांनाच याचा हेवा वाटतो. पण, खरंच या कलाकारांचं आयुष्य इतकं सुखद असतं का? त्यांच्यावर कोणत्याच गोष्टीचं दडपण नसतं? त्यांना कशाचीही चिंता नसते? तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील, तर त्याचं उत्तर आहे, हो... कलाकारांनाही दडपण येतं. त्यांनाही चिंता वाटते. ही मंडळीसुद्धा प्रचंड तणावाखाली असतात. कारण, सर्वांचच आयुष्य सुखकर नसतं. त्यात चढउतार असतातच. काही कलाकार तर असेही आहेत ज्यांच्या वाट्याला आलेलं आयुष्य, किंवा अमुक एका प्रसंग आपल्या शत्रूसोबतही घडू नये असंच तुम्ही म्हणाल.  

'त्या' आज ज्येष्ठ अभिनेत्री (Actress), पण वयाच्या सहाव्या वर्षीच झालेला अत्याचार.... 

लोकप्रिय दिग्दर्शिका (director) आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah khan) आणि अभिनेता फरहान अख्तरची (Farhan Akhtar) मावशी, अभिनेत्री डेझी इराणी (daisy irani ) यांच्याविषयी आपण आज असं काही जाणून घेणार आहोत जे कळताच तुम्हाला हादरा बसेल. 1950 मध्ये डेझी यांनी बालकलाकार म्हणून सिनेजगतामध्ये पाऊल ठेवलं. पण, पुढे जे झालं ते त्या आजही विसरू शकलेल्या नाहीत. (Hindi film insutry daisy irani raped at the age of 6 left her mother ashamed read horrifying incident)

एका मुलाखतीत खुलासा करत त्यांनी तो कटू प्रसंग प्रकाशात आणला. ज्याला आपली काळजी घेण्यासाठी नेमलं गेलं होतं त्याच गार्डियननं डेझी यांच्यावर अत्याचार केला होता. हे दिवस तेव्हाचे होते जेव्हा त्या वयाच्या सहाव्या वर्षी 'हम पंछी एक डाल के' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चेन्नईला (chennai) गेल्या होत्या. तिथं असताना एके रात्री हॉटेल रुममध्ये त्या इसमानं डेझी यांना पट्ट्यानं मारलं, (molest) अत्याचार केले आणि याबाबत कुणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली. 

आता कुठे आहे तो इसम? 

डेझी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तो इसम हयात नाही. जोहराबाई अंबालेवाली यांच्या नात्यातील त्या इसमाची कलाजगतात बरीच ओळख होती. त्या काळ्या दिवसाची आठवण डेझी यांच्या मनातून आजही गेलेली नाही. त्या वेदना, पट्ट्यानं मारण्याचा तो प्रसंग इतकं सारं होऊनही त्या चित्रीकरणासाठी सेटवर अशा गेल्या जणू काहीच झालं नव्हतं. त्यावेळी आईला काय आणि कसं सांगावं हाच प्रश्न त्यांना पडला होता. 

हेसुद्धा वाचा : 'बाथरुममध्ये बंद करुन...' पूजा भट्टचं वडिलांबाबत धक्कादायक वक्तव्य

जवळपास 10 वर्षांनंतर डेझी यांनी आईला त्या प्रसंगाविषयी सांगितलं आणि त्या सुन्न झाल्या. त्या काहीच करु शकत नव्हत्या, कारण लेकीला यशस्वी अभिनेत्री बनवण्यासाठीच त्या प्रयत्नशील होत्या. पण, लेकिसोबत घडलेल्या या अतिप्रसंगाविषयी कळताच त्यांची मान शरमेनं खाली गेली होती. आपल्या अट्टहासापोटी लेकीला कोणत्या परिस्सिथीतीचा सामना करावा लागला होता या विचारानं त्यासुद्धा खचल्या होत्या. 

कलाकार होणं सोपं नाही... 

कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.... ही ओळ कलाकारांच्या बाबतीत अनेकदा लागू होते. डेझी यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री असा प्रवास करत असताना त्यांच्या वाटेत अनके अडचणी आल्या होत्या. एका आघातानं त्या बदलल्या होत्या, इतक्या की त्यांच्याही ही गोष्ट लक्षात येत नव्हती.