१४ वर्षीय बाल कलाकाराचं निधन

त्याच्या अचानक निधनानंतर हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Updated: Dec 12, 2019, 06:18 PM IST
१४ वर्षीय बाल कलाकाराचं निधन  title=

मुंबई : बाल कलाकार आणि बॅले डान्सर जॅक बर्न्सचं निधन झालं आहे. त्याच्या अचानक निधनानंतर हॉलिवूड त्याचप्रमाणे बॉलिवूड कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. तो 'इन प्लेन साईट' आणि 'रिट्रिब्यूशन' या टी.व्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रसिद्धीझोतात आला होता. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. 

१४ वर्षीय जॅक बर्न्स त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत अढळला. पण त्याच्या मृत्यूचं ठोस कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. अधिकाऱ्यांकडून देखील याप्रकरणी खुलासा करण्यात आलेला नाही. 

मेट्रो डॉट को डॉट यूकेच्या वृत्तनुसार, जॅक १ डिसेंबर रोजी स्कॉटलंडच्या ग्रीनॉक येथील राहत्या घरी मृत अवस्थेत अढळून आला. परंतु त्याच्या मृत्यू प्रकरणी कोणत्याही प्रकारचा  खुलासा करण्यात आलेला नाही. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपासणी करत आहेत. 

याप्रकरणी कोणावरही संशय नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. टीव्ही कार्यक्रम त्यांचप्रमाणे तो डान्समध्ये देखील निपूण होता. 'आउटलँडर', 'इन प्लेन साईट' सोबत अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये तो झळकला होता. त्याचप्रमाणे त्याने 'बिली इलियट' साठी डबिंग देखील केलं होतं.