ब्रेकअपनंतर 47 वर्षीय प्रसिद्ध अभिनेता आता 27 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात; Private फोटो व्हायरल

त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा कुठे कमी होतायत तोच लिओनार्डोबद्दल आता एक नवा अपडेट समोर आला आहे. 

Updated: Sep 14, 2022, 05:23 PM IST
ब्रेकअपनंतर 47 वर्षीय प्रसिद्ध अभिनेता आता 27 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात; Private फोटो व्हायरल title=

Leonardo DiCaprio Love Affair: टायटॅनिक (Titanic) या अजरामर चित्रपटातून घरोघरी फॅमस झालेल्या लिओनार्डो डायकॅपेरिओला (Leonardo Dicaprio) आज कोण नाही ओळखत. सहा वर्षांपुर्वी 20 वर्षे वाट पाहिल्यानंतर शेवटी त्याला ऑस्कर (Academy Award) हा नामांकित पुरस्कार मिळाला. लिओनार्डाच्या पर्सनल लाईफ बद्दलही फार जास्त चर्चा केली जाते. टायटॅनिक या चित्रपटातील सह कलाकार केट विन्सलेट (Kate Winslet) हिच्यासोबतच्या त्याच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. (hollywood actor leonardo dicaprio rumoured with dating gig hadid after breaking up with camila morrone private photos goes viral)

सध्या लिओनार्डो त्याच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. 47 वर्षीय लिओनार्डोनं 25 वर्षीय कॅमेला मोरोन (Camila Morrone) हिच्या सोबत चार वर्षे चालू असणारं आपले प्रेमाचं नातं संपवलं. लिओनार्डा पंचवीस वर्षाच्या कॅमेलाला डेट करत होता त्यामुळे त्याला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा कुठे कमी होतायत तोच लिओनार्डोबद्दल आता एक नवा अपडेट समोर आला आहे. 

लिओनार्डा आता 27 वर्षीय गिग हादीद (Gig Hadid) या अमेरिकन मॉडेलला डेट करत असल्याची बातमी समोर येते आहे. त्यांचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. लिओनार्डो फक्त 25 वर्षाच्याच मुलीला डेट करतो असंही त्याच्याबद्दल बोललं जात असताना लिओनार्डो आता 27 वर्षाच्या मुलीला का डेट करतोय या चर्चांनाही विशेष उधाण आलं आहे. 

गिग आणि लिओनार्डो (Gig Hadid and Leonardo DiCaprio Dating) हे दोघं एक फॅशन वीकच्या पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. सध्या त्यांचे प्रायव्हेट फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते दोघं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेले दिसत आहेत. पापाझारींनी त्यांचे हे फोटो कॅप्चर केले आहेत आणि आता हे फोटोज सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटो पाहून सगळीकडेच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

लिओनार्डो डायकॅप्रियोचे वय 47 वर्षे आहे. त्यानं त्याच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान असलेल्या कॅमिलाला 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. त्याचं अफेअर लिओनार्डोनं खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला पण तसं होऊ शकलं नाही. त्यांनी मग तीन वर्षांनी आपलं नातं जाहीर केले. त्यानंतर ते खूपदा एकत्र स्पॉट झाले होते.