धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL

Yuzvendra Chahal Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये काही आलबेल नसून ते घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा रंगलीय. यात बातमीमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण त्यापूर्वीच युझवेंद्र एका तरुणीसोबत दिसल्याने नवीन चर्चेला तोंड फुटलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 7, 2025, 05:01 PM IST
धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL  title=

Yuzvendra Chahal Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे घटस्फोट घेणार आहे, अशा मथळाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पसरत आहेत. या मागे कारण ठरलं ते दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. एवढंच नाही तर युझवेंद्र चहलने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवरुन डिलीट केलंय. त्यामुळे हे दोघे घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा रंगलीय. त्यात भर म्हणजे घटस्फोट घेण्यापूर्वीच युझवेंद्र एका तरुणीसोबत दिसल्यामुळे तो दुसऱ्यांदा प्रेमात पडला असं म्हटलं जातं. युझवेंद्र चहल नुकताच मुंबईत एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला असून त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. 

ही मिस्ट्री गर्ल कोण?

द न्यू इंडियनने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, चहल मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला. जिथे चहलने पांढरा ओव्हरसाईज टी-शर्ट आणि बॅगी लाइट ब्लू जीन्स घातली होती. त्याच्यासोबत उपस्थित असलेली मुलगी गडद हिरव्या रंगाचा ओव्हरसाईज स्वेटशर्ट घातलेली दिसली. चहलसोबत दिसलेली मिस्ट्री गर्लबद्दल सोशल मीडियावर माहिती शोधण्याचा प्रयत्न झाला पण ती कोण आहे याबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नाही. मात्र, हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत फोटो काढताना भारतीय क्रिकेटपटू चेहरा लपवताना मात्र दिसून आला.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी पहिल्यांदा घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या, जेव्हा त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. यापूर्वी 2022 मध्ये या जोडप्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी असल्याचे संकेत दिलं होतं धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून 'चहल' हे टोपणनाव काढून टाकलं होतं. 

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनीही अद्याप या अफवांवर जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. चहलने डिसेंबर 2020 मध्ये मुंबईतील दंतचिकित्सक आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्याशी गुरुग्राममध्ये लग्न केलं. जेव्हा भारतीय क्रिकेटपटूने YouTube वर धनश्री वर्माच्या ऑनलाइन डान्स क्लाससाठी साइन अप केलं तेव्हा त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.