'त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच माझं शरीर...'; Ex Boyfriend कडून अभिनेत्रीचा छळ

तिला प्रेमाची किंमत अशी फेडावी लागली...   

Updated: Aug 1, 2022, 10:08 AM IST
'त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच माझं शरीर...'; Ex Boyfriend कडून अभिनेत्रीचा छळ title=
Hollywood Actress Mena Suvari on her sexual relationships with ex boyfriend rape

मुंबई : सहसा प्रेमाचं नातं अनेकांसाठी खुप काही घेवून येतं. हे नातं खुप काही शिकवूनही जातं. पण, जेव्हा या नात्याची विक्षिप्त बाजू समोर येते तेव्हा मात्र ते सर्व अनुभवणारी व्यक्ती बिथरून जाते. एका अभिनेत्रीनं असेच काही दिवस पाहिले ज्यांनी तिला जबर हादरा दिला. 

जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीनं या अभिनेत्रीच्या भावनांचा आणि तिच्या शरीराचाही खेळ मांडला. लाइटिंग इंजीनियरनं त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. पण, त्यावेळी ही अभिनेत्री लहान होती. काही काळानं तिला आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाची जाणीव झाली. (Hollywood Actress Mena Suvari on her sexual relationships with ex boyfriend rape)

मेना सुवारी असं या अभिनेत्रीचं नाव  (Mena Suvari) . त्यानं तिला काही महिलांशी थ्रीसम (शरीरसंबंध) ठेवण्यास भाग पाडलं होतं. या महिलांना ती सेटवरही भेटली होती. बरं, तिच्या मनाविरुद्ध या गोष्टी घडत होत्या. पण, समोरच्या व्यक्तीला मात्र हे सर्व तिच्या मनाप्रमाणेच होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

'मला प्रेम मिळालं नाही. माझं शरीर फक्त त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी होतं', असं म्हणत सुवारीनं नात्याची वेगळी बाजू मुलाखतीद्वारे सर्वांसमोर आणली. प्रत्येक वेळी कोणत्या न कोणत्या प्रकारच्या शरीरसंबंधांनंतर (SEX) नंतर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागत होतं, असाची खुलासा तिनं केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@menasuvari)

मागील वर्षी एका मुलाखतीत मेनानं अशाच पद्धतीचा धक्कादायक खुलासा केला होता. जिथं भावाच्या मित्रानं तिच्यावर अत्याचार केले होते. वयाच्या 13 व्या वर्षी मेनानं या प्रसंगाचा सामना केला. हा आघात इतका मोठा होता, की यातून सावरण्यासाठी तिला ड्रग्ज आणि अल्कोहोलचा आधार घ्यावा लागत होता. एक सेलिब्रिटी म्हणून सतत प्रसिद्धीझोतात असणाऱ्या या मंडळींच्या आयुष्याची ही बाजू खरंच वेदनादायी आहे.