Mahatma Jyotiba Phule High School : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात 01 जानेवारी 1848 रोजी मुलींची पाहिली शाळा सुरु केली होती. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या कार्यकाळात 18 मुलींच्या शाळा सुरु केल्या. मात्र नंतरच्या कळात या शाळा बंद पडल्या...असं असलं तरी फुले यांनी सुरु केलेली ओतूर येथील मुलींची चौथी शाळा 175 वर्षांनंतर आजही ज्ञानदानाचं काम करतेय.
राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केलाय. पुण्याच्या भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली... पुण्यासोबत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण बागातही महात्मा फुलेंनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. यातील काही शाळा बंद पडल्या असल्या तरी जुन्नर तालुक्यातील ओतूरची मुलींची शाळा अद्यापही मुलींच्या शिकवण्याचं काम अविरतपणे करतेय.
महात्मा ज्योतीराव फुले यांनी एकूण अठरा शाळा सुरू केल्या. त्यातील ओतूरची ही शाळा गेल्या 175 वर्षांपासून अविरत ज्ञानदानाचं काम करतेय. महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजातील सहकारी भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली...आज ही या शाळेत मुलींचे चौथी पर्यतचे वर्ग भरतात. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ही शाळा चालवली जातेय.
आज ओतूरची ही शाळा सुरु असली तरी तिची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. ही शाळा म्हणजे केवळ वर्ग खोल्या नाहीत तर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. त्यामुळं हा वारसा नेटाने जपवायला हवाय. तो दिमाखात उभारायला हवाय.