मुंबई : 24 फेब्रुवारी 2018 हा दिवस बॉलिवूडसाठी काळा दिवस आहे. बॉलिवूडची 'चांदनी' म्हणजेच श्रीदेवी यांनी या दिवशी जगाचा निरोप घेतला. प्रेक्षकांसाठी ही अशी बातमी होती की, त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. ज्यांनी ही बातमी पहिल्यांदा ऐकली त्यानंतर क्षणभर या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण होतं. श्रीदेवी यांनी दुबईत अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांचा मृत्यू कसा झाला? हा प्रश्न अनेक वर्षांनंतरही लोकांच्या मनात आहे. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांकडून कधीही कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नव्हते, परंतु अभिनेत्रीच्या निधनाच्या 5 वर्षानंतर बोनी कपूर यांनी त्या रात्रीचं रहस्य उघड केलं आहे आणि अभिनेत्रीचा मृत्यू कसा झाला हे सांगितलं आहे.
अनेक वर्षांपासून श्रीदेवी यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे 5 वर्षांनंतर हे गुपित उघड झालं असून खुद्द चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनीच श्रीदेवी यांच्या निधनाचं कारण उघड केलं आहे. त्यांनी सांगितलं की, अभिनेत्रीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता.
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी गेल्या ५ वर्षांपासून पत्नी आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनावर मौन बाळगलं होतं. आता ते पहिल्यांदाच या विषयावर उघडपणे बोलले आहेत. 'द न्यू इंडियन'ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्माते म्हणाले, 'हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी चौकशी केली जात असताना मी सुमारे 24 किंवा 48 तास याबद्दल बोललो होतो. खरं तर, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना हे करावे लागलं कारण भारतीय माध्यमांचा त्यांच्यावर खूप दबाव होता आणि त्यांना आढळलं की यात कोणताही गैरप्रकार नव्हता. मी लाई डिटेक्टर टेस्टसह आणि इतर सर्व चाचण्या केल्या आणि त्यानंतर, अर्थातच, स्पष्टपणे आलेला अहवाल हा अपघाती होता'.
संभाषणात बोनी कपूर पुढे म्हणाले की, तिच्या मृत्यूच्या वेळीही श्रीदेवी डाएटवर होत्या 'अनेकदा ती उपाशी रहायची. तिला छान दिसायचं होतं. पडद्यावर ती चांगली दिसावी यासाठी ती खूप प्रयत्न करायची . माझ्याशी लग्न झाल्यापासून तिला काही वेळा ब्लॅकआउटची समस्या होती आणि डॉक्टर तिला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगत राहिले.
बोनी कपूर पुढे म्हणाले की, नागार्जुनने अशाच एका घटनेबद्दल सांगितलं होतं, जेव्हा श्रीदेवी एका शूटदरम्यान बाथरूममध्ये बेशुद्ध पडल्या होत्या. यावंर ते म्हणाले, 'हे दुर्दैवी होतं. नंतर जेव्हा तिचं निधन झालं. नागार्जुन शोक व्यक्त करण्यासाठी घरी आला आणि त्याने मला सांगितलं की, तिच्या एका चित्रपटादरम्यान ती पुन्हा क्रॅश डाएटवर होती आणि त्यामुळेच ती बाथरूममध्ये पडली आणि तिचे दात पडले.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.