मनिषा कोईराला - नाना पाटेकर एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले, पण नंतर हे नातं तुटलं

 बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात.

Updated: May 18, 2021, 08:45 PM IST
 मनिषा कोईराला - नाना पाटेकर एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले, पण नंतर हे नातं तुटलं

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांचे अवेकवेळा ब्रेकअपदेखील होतात. यातील एक म्हणजे नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची लव्हस्टोरी. मनीषा आणि नानांच्या ब्रेकअपच्या चर्चा कायम चर्चेत असतात.. ज्या प्रकारे दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्याचा शेवटही तितकाच वाईट झाला

एक काळ असा होता की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण त्यांच्यात अशी एक गोष्टी घडली की त्यांचं प्रेम कायमचं संपलं. आज आम्ही तुम्हाला या दोघांची ब्रेकअप स्टोरी सांगणार आहोत

दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली
असं म्हणतात की, नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी 'अग्निसाक्षी' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या सिनेमांत दोघांमध्ये खूप चांगली मैत्री बनली होती आणि त्यांची जवळिकतेचं रूपांतर प्रेमात झालं होतं. यावेळी मनीषा नानांपेक्षा 20 वर्षांनी लहान होती.

दोघेही प्रेमात बुडाले
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला जेव्हा 'खामोशी द म्युझिकल' मध्ये एकत्र काम करत होते, तेव्हा दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. असं म्हणतात की, या चित्रपटात मनीषाच्या वडिलांचा एक मामा देखील होता. या दोघांच्या नात्याबद्दल त्यांना कळालं होतं. जेव्हा दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली तेव्हा नानांचं आधीच लग्न झालं होतं. असे म्हणतात की, नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलाकांती यांचं नातं ठीक नव्हतं. असंही म्हटलं जातं की, त्यावेळी नीलाकांती त्यांच्यापासून वेगळ्या राहायच्या

नाना मनीषाबद्दल पझेसिव्ह होते
असं म्हटलं जातं की, नाना मनीषावर इतकं प्रेम करत होते की ते तिच्या बाबतीत खूप पझेसिव्ह झाले होते. असं म्हणतात की चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनीषा लहान कपडे घालायची पण नाना पाटेकर यांना ते आवडायचं नाही, असे कपडे घालायला नाना मनिषाला नकार द्यायचे.

आपल्या नात्यावर नाव हवं होतं मनिषाला
नानांच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेल्या मनीषाला तिच्या नात्याला नाव द्यायचं होते. तिला नाना पाटेकर यांच्याशी लग्न करायचं होतं. पण नाना यांना आपली पत्नी निलकांतीशी घटस्फोट घ्यायचा नव्हता. निनांची नाराजी आणि लग्न न करण्याच्या निर्णयामुळे मनीषा त्यांच्यापासून दूर जावू लागली

अभिनेत्रीसोबत पकडलं होतं
बातमीनुसार, जेव्हा मनीषाने नाना यांना दुसर्‍या अभिनेत्रीसोबत पकडलं. तेव्हा या दोघांचं नातं पूर्णपणे तुटलं. एका वृत्तानुसार, एकदा मनीषाने आयशा जुल्काला नाना यांच्या खोलीत एकत्र पाहिलं. नानांना आयशासोबत पाहून मनिषाला खूप वाईट वाटलं.

यानंतर त्यांनी लग्नासाठी मनिषाला खूप आग्रह केला पण मनीषाने हे नात पूर्णपणे तोडलं होतं. नानांच्या या वागणुकीमुळे मनीषाचे हृदय तुटलं म्हणुनच नानांपासून दूर जायचा निर्णय तिने घेतला. हे नातं तुटल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नव्हता की, आता मनीषा आणि नाना पुन्हा कधीही एकत्र दिसणार नाहीत