अदा शर्मासोबत नक्की किती माणसं; व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

अदा शर्माच्या मिठीत असलेला व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

Updated: Oct 22, 2021, 03:17 PM IST
अदा शर्मासोबत नक्की किती माणसं; व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांची अभिनेत्री अदा शर्मा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवडते. कमांडो गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अदा शर्मा कधी लेटेस्ट फोटोशूट तर कधी डान्स व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्री फिटनेस व्हिडिओ आणि मजेदार व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. आता देखील तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. 

तिचा हा मजेदार व्हिडिओ देखील चाहत्यांसाठी एक आव्हान आहे की व्हिडिओमध्ये नक्की किती लोक आहे. अदा शर्माने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दिसून येते की दोन लोक एकमेकांना मिठी मारत आहेत, परंतु व्हिडिओच्या शेवटी एक आश्चर्यकारक दृश्य समोर आले कारण व्हिडिओमध्ये दोन लोक नाहीत. फक्त आहे एक आणि ती स्वतः अदा शर्मा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदा शर्मा सध्या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यापैकी एक लघुपट आहे आणि दुसरा तेलुगू चित्रपट आहे. अदा शर्मा शेवटी 'कमांडो 3' चित्रपटात दिसली होती. अदाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2008 मध्ये '1920'  हॉरर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. '1920' चित्रपटाच्या यशानंतर अदा शर्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे.