Nora Fatehi एका गाण्यासाठी घेते इतकं मानधन...

बॉलीवूडच नाही तर या अभिनेत्रीने कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.  

Updated: Mar 22, 2022, 06:32 PM IST
  Nora Fatehi एका गाण्यासाठी घेते इतकं मानधन... title=

मुंबई : दिलबर गर्ल नोरा फतेहीचे अनेक अल्बम साँग आहेत जे हिट ठरले आहेत. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोरा तिच्या आयटम साँगसाठी खूप लोकप्रिय आहे. नोरा फतेहीचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे.

तिचा बोल्ड अंदाजावर चाहते फिदा आहेत. हार्डी संधूच्या नाह गोरीये या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली. या गाण्यात नोराचा परफॉर्मन्स पाहून अनेकजण तिच्या प्रेमात पडले. जणू काही तिने बोल्ड डान्सने सगळ्यांनाच तिचं वेड लावलं.

हे गाणे हिट होताच नोरा फतेहीला अनेक मोठ्या गाण्यांसाठी विचारण्यात आलं. त्यानंतर नोरा फतेहीला बेस्ट डान्सर म्हणून अनेक पुरस्कार मिळाले.

नोरा फतेहीबद्दल जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असताना आता तिच्या लाईफस्टाईलबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तिने बॉलिवूडमध्ये काम करून मोठी कमाई केली आहे.

ती एका गाण्यासाठी 40 लाख रुपये इतकं मानधन घेत असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर नोराने तिचे 'हाय गरमी' हे गाणे हिट झाल्यानंतर तिची फी वाढवली होती.

सोशल मीडियावर एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये घेते. नोरा फतेहीने आतापर्यंत वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कर, जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यासह अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.

नोरा फतेही बॉलीवूडमधील सर्वात जास्त मागणी मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी 2 कोटी रुपये कमवते असं बोललं जात आहे. बॉलीवूडच नाही तर या अभिनेत्रीने कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.