Mazhi Tuzhi Reshimgaath : वाचता येत नाही, तरी परी कसं करतेय मालिकेचं शूट !

 त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात

Updated: Dec 4, 2021, 01:08 PM IST
Mazhi Tuzhi Reshimgaath : वाचता येत नाही, तरी परी कसं करतेय मालिकेचं शूट !

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली आहे. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हा दिसत आहे.

श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये यशची भूमिका अत्यंत चोख बजावतोय. तसेच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ती चिमुरडी बाल कलाकार मायरा वायकुळ. मायरा हीने या मालिकेत परीची भूमिका साकारली आहे.

मायरा हि सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टीव्ह आहे. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती सीन्सची प्रॅक्टीस करताना दिसत आहे, तर याबाबतच अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते, तर मायरा‌ हिला ज्या वेळेस शुट करायचा असतो, त्यावेळेस ती अनेकांची मदत घेते.

माझी तुझी रेशीमगाठ" मधील परी घेते एवढं मानधन! वाचून थक्क व्हाल -

सुरुवातीला मालिकेचे दिग्दर्शक मायरा हिला तीचा सीन काय आहे, ते समजून सांगतात. त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात.

 

mazi tuzi reshimgath serial pari aka mayra payment, Pari Lifestyle

त्यानंतर ती आपल्याला काय डायलॉग म्हणायचे आहेत, ते आत्मसात करते. त्यानंतर ती अतिशय व्यवस्थित रित्या डायलॉग डिलिव्हरी करते. तिच्या निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.