'My Love सुझान...', बायकोच्या वाढदिवशी प्रियकराची पोस्ट, हृतिक म्हणाला 'तुम्ही...'

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुझान खानचा आज 48 वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिच्या प्रियकराने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली असून, त्यावर हृतिक रोशननेही कमेंट केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 26, 2023, 03:03 PM IST
'My Love सुझान...', बायकोच्या वाढदिवशी प्रियकराची पोस्ट, हृतिक म्हणाला 'तुम्ही...'

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुझान खानचा आज 48 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिचा प्रियकर अर्सलन गोनी याने इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने फोटो एकत्रित करत हा व्हिडीओ तयार केला आहे. तसंच या व्हिडीओसह एक पोस्टही लिहिली आहे. यावर सुझान खाननेही  कमेंट केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर सुझान खानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशननेही कमेंट केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अर्सलन याने सुझान खानचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माय लव्ह सुझान खान...सर्वप्रथम मी याक्षणी तुझ्यासोबत नाही याचं मला वाईट वाटत आहे. पण हे पाहणं किती आनंददायक आहे. आपण काही गोष्टी गमावू शकतो पण नक्कीच चांगल्या आठवणी बनवतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला जगातील सर्व आनंद मिळो अशा शुभेच्छा देतो. शब्द दिल्याप्रमाणे आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा आनंद साजरा करु. मला पुन्हा विश्वासू बनवल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू.. हे फक्त आपल्याला समर्पित आहे".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arslan Goni (@arslangoni)

अर्सलनच्या या पोस्टवर सुझान खानने कमेंट केली आहे. तुझ्या निमित्ताने मला सर्वात चांगली भेट मिळाली असल्याचं ती म्हणाली आहे. "Myyyyyyyyy Love my Jaaanuuuu. तू माझे सर्वस्व आहेस. मी या ग्रहावरील आणि जगातील सर्वात भाग्यवान महिला आहे. तुझ्या निमित्ताने मला सर्वोत्तम भेट मिळाली आहे". 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

सुझान खानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशननेही या पोस्टवर कमेंट केली आहे. "वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो," असं हृतिकने लिहिलं आहे. 

सुझान खानचं अभिनेता हृतिक रोशनसोबत लग्न झालं होतं. 2000 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुलं आहेत. हृतिक रोशन सध्या अभिनेता-संगीतकार सबा आझादला डेट करत आहे. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते.

इंटिरिअर डिझायनर असण्याव्यतिरिक्त, सुझान खान मलायका अरोरा आणि बिपाशा बसूसह 'द लेबल लाइफ' नावाचा ब्रँड चालवते. तिने गोव्यातील एका रेस्टॉरंटचे इंटिरिअरही केलं आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More