हृतिक रोशनने शेअर केला आपल्या हृदयाचा फोटो

शेअर केला फोटो 

Updated: Dec 3, 2019, 07:09 PM IST
हृतिक रोशनने शेअर केला आपल्या हृदयाचा फोटो

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने सोमवारी रात्री खूप उशिरा इंस्टाग्रामवर आपल्या हृदयाचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत त्याने खूप इमोशनल मॅसेज देखील लिहिला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय झाला असून त्याची पोस्ट खूप प्रमाणात व्हायरल होत आहे. 

'मेरे दिल का आकार | सचमुच.. हम सभी कितने कमजोर है' मी माझ्या आयुष्यातील खूप वेळ खर्च केला आहे. आपण अनेकदा विसरून जातो की आपण एकमेकांना प्रेम दिलं पाहिजं. आपण सगळे एक असून एकमेकांना प्रेम द्यायला हवं. 12 तासाच्या आता हृतिकचा हा फोटो जवळपास 9 लाख लोकांनी लाइक केला आहे. अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी तर 'हृदय स्वस्थ दिसतंय.' एका चाहत्याने तर लिहिलं 'प्रेरणादायक.' 

कामाबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये हृतिकने 'सुपर 30' आणि 'वॉर' या दोन सिनेमांत काम केलं आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरली आहेत. 'वॉर' सिनेमाने 300 करोड रुपये बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

. What about the war within? There is no war within . But then the look in his eyes gives it all away . . K.A.B.I.R

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

यावर्षातील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत हृतिकने कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. मात्र पुढल्यावर्षी हृतिक एका सिनेमात दिसण्याची चर्चा आहे.