मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'सुपर ३०' चर्चेत आहे. मात्र आता अनेक वादांनंतर 'सुपर ३०'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हृतिक रोशनने 'सुपर ३०' चित्रपटाचं पोस्टर जाहीर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृतिक आपल्या विद्यार्थ्यांसोबत उभा असल्याचं दिसतंय. या पोस्टरसह त्याने 'सुपर ३०'चा ट्रेलर ४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचीही घोषणा केली आहे.
Haqdaar bano! #Super30Trailer coming on June 4.@mrunal0801 @nandishsandhu @TheAmitSadh @teacheranand @Shibasishsarkar #SajidNadiadwala @RelianceEnt @NGEMovies @PicturesPVR @super30film @ZeeMusicCompany pic.twitter.com/iVolaI8Unh
— Hrithik Roshan (@iHrithik) June 2, 2019
'सुपर ३०' चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु आता चित्रपटाची तारिख बदलण्यात आली असून १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
Hrithik Roshan... First look poster of #Super30... 12 July 2019 release. pic.twitter.com/rFVBjh8efV
— taran adarsh (@taran_adarsh) June 2, 2019
चित्रपट प्रदर्शित न होण्यामागे #MeToo मोहिमही कारणीभूत ठरली होती. मात्र आता दिग्दर्शक विकास बहलची चित्रपटात एन्ट्री झाल्यानंतर 'सुपर ३०' या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत विकासला दिग्दर्शक म्हणून श्रेय देण्यात येणार आहे.
आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे.