'तान्हाजी'च्या पाठीवर हृतिककडून शाब्बासकीची थाप

सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 250 कोटीच्या घरात 

Updated: Feb 20, 2020, 08:30 AM IST
'तान्हाजी'च्या पाठीवर हृतिककडून शाब्बासकीची थाप  title=

मुंबई : अजय देवगनच्या 'तान्हाजी' सिनेमाने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तरीही सिनेमा आजही प्रेक्षकांच मन जिंकत आहेत. सिनेमात सैफ अली खान आणि काजोलच्या भूमिकेची देखील चर्चा रंगली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर अतिशय सुपरहिट ठरत आहे. सिनेमाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांची कमाई केली आबे. 

अभिनेता ऋतिक रोशनने आपल्या ट्विटर हँडलवर अजय देवगनच्या 'तान्हाजी-द अनसंग वॉरिअर' सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. हृतिकने ट्विट केलं आहे. 'नुकताच मी तान्हाजी सिनेमा पाहिला आहे. सिनेमा अविश्वसनीय आहे. शानदार ऍक्शन. अजय आणि काजोलचा सुंदर अभिनय. सैफ या सिनेमात खूप प्रभावित दिसला. काय सिनेमा आहे, अशा शब्दात हृतिकने सिनेमाचं कौतुक केलं आहे.'

हृतिकने केलेल्या या ट्विटला अजय देवगनने रिप्लाय दिला आहे. अजय देवगनने हृतिकचे आभार मानले आहे. त्याने रिप्लाय देताना म्हटलं की, 'धन्यवाद, हृतिक. ADFFच्या संपूर्ण टीमने तान्हाजीवर भरपूर मेहनत केली आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की सिनेमा तुला आवडला.'

2019 मधील 'तान्हाजी' हा उत्कृष्ठ सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.