close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिषेकही सलमान- ऐश्वर्या या जोडीच्या प्रेमात

अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही नेहमीच एकमेकांची साथ दिली आहे. 

Updated: Oct 23, 2018, 01:47 PM IST
अभिषेकही सलमान- ऐश्वर्या या जोडीच्या प्रेमात

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ही सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत अग्रस्थानी येणारी जोडी असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं असो किंवा मग अडचणीच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं असो. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही जोडीदार म्हणून एकमेकांची साथ दिली आहे. 

कलाविश्वातील कारकिर्दीतही ते दोघंही एकमेकांना आधार देत असतात. एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. 

याचाच प्रत्यय नुकताच एका चॅट शोमध्ये पाहायला मिळाला. 

राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्या 'पॉडकास्ट २' या शोमध्ये अभिषेकने त्याच्या बालपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला. त्यासोबतच त्याने चित्रपटांविषयीसुद्धा आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळालं. 

सर्वाधिक आवडत्या चित्रपटाविषयी विचारलं असता अभिषेकने 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाचं नाव घेतलं. 

ऐश्वर्याचा अभिनय असणाऱ्या चित्रपटांपैकी हा आपला सर्वाधिक आवडता चित्रपट असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट १९९९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ऐश्वर्या राय, सलमान खान, अजय देवगण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

तेव्हा आता एका अर्थी 'हम दिल दे चुके'च्या निमित्ताने ऐश्वर्या- सलमान या ऑनस्क्रीन जोडीच्या अभिषेकही प्रेमात आहे असंच म्हणावं लागेल. 

इथे सलमानचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे, 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. 

योगायोगाने या गोष्टी अशा जोडल्या गेल्यामुळेच सध्याच्या घडीला त्याविषयीची चर्चा होत आहे. दरम्यान ऐश्वर्यासोबत आवडत्या चित्रपटांच्या विषयावरुन कधीच चर्चा केल्या नसल्याचंही त्याने या कार्यक्रमात स्पष्ट केलं. 

तेव्हा आतातरी अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये त्यांच्या आवडीच्या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.