मुंबई : 'हम किसी से कम नही' या सिनेमातील चॉकलेट हिरो तुम्हाला आठवतोय का? हातात गिटार घेऊन त्याने 'क्या हुआ तेरा वादा...' हे गाणं गायलं होतं. 70 व्या दशकात हा सिनेमा अतिशय लोकप्रिय झाला होता. दर्शकांना हे गाणं आठवतो तो कलाकार आठवतो पण त्याचं नाव मात्र खूप कमी लोकांना माहित असेल.
या अजरामर गाण्यातील हिरोचं नाव आहे तारिक हुसैन खान. हा अभिनेता तारिक खान यांच्या नावाने ओळखला जातो. हे गाणं आजही लोकप्रिय आहे. त्याकाळी या अभिनेत्याने लाल वेस्ट कोट, हातात गिटार आणि डोळ्या अश्रू अशा रुपात येणं पसंत केलं. तारिक यांचा हा तिसरा सिनेमा असून त्यांनी 1973 मध्ये 'यादों की बारात' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली. हा सिनेमा हिट होता पण यामुळे तारिक यांना काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर 1975 मध्ये 'जख्मी' सिनेमात त्यांनी काम केलं. पण हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर 1977 मध्ये 'हम किसी से कम नही' या सिनेमात दिसला. या सिनेमाने अभिनेत्याला खूप नाव मिळवून दिलं. यानंतर अनेक मुली तारिक यांच्या चाहत्या झाला. महत्वाचं म्हणजे तारिक सुपरस्टार आमिर खानचे चुलत भाऊ आहेत.
हे तीन म्युझिकल सिनेमे दिल्यानंतर त्यांची कारकिर्द सुरूच राहिली. एका पाठोपाठ अनेक सिनेमे मिळाले आणि हा प्रवास सुरूच राहिला. मात्र कालांतराने हा प्रवास थांबला आणि अभिनेता तारिक खान सिनेसृष्टीतून गायब झाले. सिनेसृष्टी सोडण्याबाबत स्वतः तारिक खान यांनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्या मुलाखतीत खान यांनी सांगितलं की, मला खूप असुरक्षित वाटू लागलं. मला असं वाटू लागलं की, मी अशा ठिकाणी आहे जिथे माझं करिअर सुरक्षित नाही. त्यामुळे मला नोकरी करायची होती जिथे मी सुरक्षित असेन.
तारिक खान एका शिपमेंट कंपनीत सुपरवायजिंग एक्झिक्यूटीवचं काम करत आहे. तसेच ट्रॅवल टिकटिंग आणि कार्गो फॉर्वडिंगमध्ये त्यांनी डिप्लोमा देखील केला आहे.