मुंबई : 'बडे अच्छे लगते हैं', 'कुमकुम', 'भक्ती ही शक्ती है' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री चाहत खन्ना हिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीच्या या फोटोंवरून कौतुक होत आहे.
मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे
चाहत खन्ना आजकाल मालदीवमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. जिथे ती सुंदर बीच लोकेशनवरून स्वतःचे एकापेक्षा-एक हॉट फोटो पोस्ट करत आहे. चाहतने तिचे खूप सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये बिकिनीमध्ये दिसत आहे.
गरोदरपणात घरातून हाकलून दिलं होतं
चाहत खन्ना एकदा एका मुलाखतीत म्हणाली की, 'माझ्या दोन्ही गरोदरपणात माझा नवरा मला विचारायचा की, ही मुलं माझीच आहेत का? माझ्या दुसऱ्या गरोदरपणाच्या चौथ्या दिवशी, त्याने मला घराबाहेर काढलं आणि बाहेर फेकलं. गरोदरपणाच्या वेळीही तो मला मारहाण करायचा.
इतक्या अडचणींनंतरही चार वर्षे हे लग्न चालवल्यानंतर चाहत म्हणाली, 'माझं या आधीचं लग्नही अयशस्वी झाल्यामुळे मला न्याय मिळेल याची मला भीती वाटत होती. हे सगळं कोणत्याही महिलेसाठी सोपं नाही, मात्र माझ्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. म्हणूनच मी माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 10 व्या वर्षी पहिलं लग्न
याआधी चाहत खन्नाने 2006 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी भरत नरसिंघानियासोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न फक्त 7 महिने टिकलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहतने तिच्या पहिल्या पतीवर मारहाण आणि अत्याचाराचा आरोपही केला होता.