Javed akhtar On Kangana ranaut: अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत (Kangana ranaut) यांच्यातील भांडणानंतर जावेद अख्तर यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. हृतिकने जावेद अख्तर यांचं म्हणणं ऐकलं मात्र, कंगनाने जावेद अख्तर (Javed akhtar) यांचं ऐकणं सोडा, त्यांच्यावर गंभीर आरोप केले. जावेद अख्तर यांनी आपल्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. त्याचबरोबर सुशांतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येच्या सुसाईड गँगशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यानंतर जावेद अख्तर यांनी 2020 मध्ये कंगनाविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यावर आता जावेद अख्तर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या गटाचा मी सदस्य असल्याचा आरोप कंगानाने माझ्यावर केला. या सर्व प्रकरणात मला अपमानास्पद वाटत होतं. तिच्या या आरोपानंतर माझ्यावर मोठ्या प्रमाणात सामाजिक दबाव आला. लोकांनी देखील मला या गोष्टी विसरू दिल्या नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब होती. त्यामुळेच मला कंगनाविरोधात (Kangana ranaut) तक्रार दाखल करावी लागली होती, असं वक्तव्य जावेद अख्तर (Javed akhtar) यांनी केलंय.
आमच्या लखनऊमध्ये एकमेकांशी बोलताना अरे तुरे करत नाहीत, तुम्ही असं म्हणत आम्ही आदर देतो, आम्हाला ते आधीपासून शिकवलं जातं. माझ्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीशी देखील मी अशाच पद्धतीनं बोलतो. मी आतापर्यंत माझ्या वकीलांना देखील कधी एकेरी संबोधलं नाही. मात्र, माझ्यावर जे खोटे आरोप झाले, त्याने मला नक्कीच धक्का बसलाय, असं जावेद अख्तर यांनी न्यायालयात म्हटलं होतं.
दरम्यान, कंगना आणि हृतिक यांच्यातील वादावर जावेद अख्तर यांना मध्यस्थी करण्याची विनंती डॉक्टर रमेश अग्रवाल यांनी केली होती. त्यांच्या विनंती मान ठेवून त्यांनी दोघांची समजूत घातली होती. मात्र, कंगनाने अख्तरांवरच गंभीर आरोप केले. सॉरी म्हणा आणि एकमेकांचे मित्र व्हा, असा सल्ला अख्तर यांनी दोघांना दिला होता. मात्र, दोघांचं अखेर काही जुळलं नाही.