मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे नीना कुलकर्णी, नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. नीना कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. यावर स्वतः नीना कुलकर्णी यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सध्या नीना कुलकर्णी यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी निधनाच्या अफवावर म्हटलं आहे की, देवाच्या कृपेने मी व्यवस्थीत आहे. महत्त्वाचं म्हणजे मी काम करत आहे. त्यामुळे तुम्ही अशा अफवांना पसरवू नका. मी जिवंत आहे. नीना कुलकर्णी यांनी इंस्टाग्रामवर स्टेटसवर ही पोस्ट ठेवली आहे.

नीना कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नीना कुलकर्णी खूप ऍक्टिव आहेत. अनेकदा ते आपले आणि पक्षाचे फोटो पोस्ट करत असतात. नीना कुलकर्णी यांना श्वान, मांजर आणि पक्ष्यांची आवड आहे. त्या अनेकदा आपल्या या पाळीव प्राण्यांचे फोटो पोस्ट करताना दिसतात. नीना कुलकर्णी 68 वर्षीय असून त्या अतिशय फीट आहेत.

नीना कुलकर्णी सध्या 'स्टार प्रवाह' वरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करत आहेत. त्यांनी या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. त्यांच्यासोबच पूजा विरारी आणि विशाल निकम देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.