बिग बींच्या नातीसोबतच्या रिलेशनशिपविषयी बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा

मीजान आणि नव्या यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

Updated: Jun 12, 2019, 01:53 PM IST
बिग बींच्या नातीसोबतच्या रिलेशनशिपविषयी बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा

मुंबई : संजय लीला भंन्साळी यांच्या आगामी 'मलाल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा मीजान जाफरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाशी असलेल्या मैत्रीमुळे सोशल मीडियावरुन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मीजान आणि नव्या यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांबाबत सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. नुकतंच मीजान जाफरीने एका मुलाखतीत नव्या आणि त्याच्या मैत्रीबाबत खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता मीजान जाफरीने नुकतीच 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत नव्या आणि त्याच्या मैत्रीबाबत खुलासा केला. मुलाखतीत त्याला नव्या नवेली नंदा आणि त्याच्या मैत्रीबाबत विचारण्यात आलं. यावर मीजानने 'आम्ही केवळ चांगले मित्र आहोत' असं सांगितलं. 'मी आणि नव्या आम्ही सारख्याच फ्रेंड सर्कलमधून आहोत. नव्या माझ्या बहिणीची खास मैत्रिण आहे आणि माझीही चांगली मैत्रिण आहे. मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं' त्याने सांगितलं.

मीजान जाफरीची बहिण अलाविया जाफरी नव्याची अतिशय खास मैत्रिण आहे. त्यासोबतच मीजान आणि नव्याचे इतर अनेक मित्र-मैत्रिणीही सारखेच आहेत. त्यामुळे ते दोघेही चांगले मित्र असल्याचं मीजानने मुलाखतीत म्हटलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alaviaa Jaaferi (@alaviaajaaferi) on

बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान संजय लीला भंन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ५ जुलै रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मीजानसह या चित्रपटातून शर्मिन सेगल स्क्रिन शेअर करणार आहे. 

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने इंग्लंडमधील सेवन ओक्स स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. आता न्यूयॉर्कमधील फोरडॅम यूनिव्हर्सिटीमध्ये ती पुढील शिक्षण घेत आहे. नव्या आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांनी एकाच शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. नव्या आणि आर्यनही त्यांच्या मैत्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात.