''मी कधीच हॉलीवूडचा सिनेमा करणार नाही''; किंग खानने स्वतःच केला खुलासा

नुकतेच शाहरूखचे एक जुने वक्तव्य व्हायरल होत आहे 

Updated: Jul 21, 2022, 03:27 PM IST
''मी कधीच हॉलीवूडचा सिनेमा करणार नाही''; किंग खानने स्वतःच केला खुलासा title=

मुंबईः गेल्या अनेक महिन्यापासून शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान सध्या भलताच चर्चेत आहे. त्याने नुकताच त्याच्या जवान या चित्रपटातला पहिला लुक त्याने रविल केला त्याच्यासाठी हा लुक फार खास आहे त्यातून त्याचा पठाण हा बहूचर्चित चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

नुकतेच शाहरूखचे एक जुने वक्तव्य व्हायरल होत आहे आणि सध्या त्याच्या या वक्तव्यावर त्याच्या चाहत्यांनाही फारच धक्का बसला आहे. त्याचे हे म्हणणं नक्की आहे तरी काय हे त्याच्या चाहत्यांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

2008 च्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पत्रकार परिषदेच्या दरम्यान त्याला एकाने प्रश्न विचारला होता की तो अद्याप हॉलीवूडमध्ये का आला नाही. तेव्हा त्याने दिलेले उत्तर त्याच्या चाहत्यांसाठी धक्का देणारे होते. 

त्यावेळेस तो त्याला उत्तर देत म्हणाला होता की, "माझे इंग्रजी चांगले नाही, जर त्यांनी मला बोलता न येणाऱ्या मुक्या व्यक्तीची भूमिका दिली, तर कदाचित शक्यता आहे की मी हॉलीवूडमध्ये काम करेन. मी आता म्हतारा होण्याच्या मार्गावर आहे. माझे केस पांढरे झाले आहेत. अभिनेता म्हणून माझा कोणताही यूएसपी नाही, माझ्याकडे काही खासियत नाही. मला कुंग फू माहित नाही, मी साल्सा डान्स करत नाही आणि मी पुरेसा उंच नाही...मी अलीकडचे युरोपियन चित्रपट पाहिले आहेत, तिथे माझ्यासाठी असं काहीच नाही, माझ्यासाठी हॉलीवूडमध्ये जागा नाही. मी पुरेसा प्रतिभावान आहे असे मला वाटत नाही. त्याऐवजी, मला बॉलीवूडमध्ये काम करत राहायला आवडते आणि इथेच काम करायला आवडेल आणि भारतीय सिनेमा जगात पुढे न्यायचा आहे.”

शाहरूखचे असे म्हणणे आहे तो जे करतोय ते आनंदाने करतोय आणि तो त्यात सुखी आहे. आता लवकरच शाहरूख खान त्याच्या आगामी पठाण या चित्रपटातून दिसणार आहे.