close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बॉयफ्रेंडने धोका दिल्यास तो पुढचा दिवस पाहणार नाही'- सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षीच्या पालकांना तिच्यासाठी सभ्य मुलाची अपेक्षा आहे.

Updated: Jul 20, 2019, 12:18 PM IST
'बॉयफ्रेंडने धोका दिल्यास तो पुढचा दिवस पाहणार नाही'- सोनाक्षी सिन्हा

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमीच नात्याच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यासंबंधीत जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते.  बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कोणाला डेट करते याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ती सिंगल आयुष्य जगत आहे. सोनाक्षीच्या पालकांना तिच्यासाठी सभ्य मुलाची अपेक्षा आहे. नुकातच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला आहे.

सोनाक्षीने एका चांगल्या आणि सभ्य मुलाला डेट करावं अशी तिच्या पालकांची इच्छा आहे, पण बॉलिवूडमध्ये अशा मुलाचं भेटणं फार कठीण आहे. सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये कोणाला डेट करशील असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सोनाक्षी म्हणाली की, 'माझ्या आई-वडिलांना वाटतं की मी चांगल्या आणि सभ्य मुलाला डेट करावं पण बॉलिवूडमध्ये असे मुलं नाहीत.'

अभिनेता-राजनेता शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी सोनाक्षीने एक चकीत करणारा खुलासा केला आहे. सोनाक्षीने एका सेलेब्रिटीला डेट केले होते. याबद्दल कोणालाच माहिती नव्हाती. परंतू या विषयावर तिने अधीक बोलणे मात्र टाळले. त्यानंतर ती म्हणाली की 'जर माझा बॉयफ्रेंड मला धोका देईल, तर तो दुसरा दिवस बघणार नाही.'

सोनाक्षी लवकरच 'खानदानी सफाखाना' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिल्पी दासगुप्ता यांच्या खांद्यावर आहे. २ ऑगस्ट रोजी 'खानदानी सफाखाना' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.