मुंबई : बिग बॉस 15 सुरू होऊन फक्त दोन आठवडे झाले आहेत आणि आतापासून, कुटुंबातील सदस्यांमध्ये शाब्दिक युद्धापासून ते हाणामारी दिसून येत आहे. उर्वरित पर्वाच्या तुलनेत, यावेळी स्पर्धकांमधील मारामारीपासून रोमान्सपर्यंत सर्व गोष्टी एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत. आता चर्चा आहे की लवकरच या घरात आणखी दोन स्पर्धक येणार आहेत. हे स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून घरात होणार आहे.
शमिता शेट्टी शोमध्ये हे वाईल्ड कार्ड पाहून आनंदित होईल, तर दुसरीकडे करण कुंद्राला मोठा धक्का बसणार आहे. कारण राकेश बापट आणि अनुषा दांडेकर लवकरच स्पर्धक म्हणून शोमध्ये दिसणार आहेत.
बिग बॉस ओटीटी मध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यात प्रचंड जवळीक होती. दुसरीकडे, करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघेही 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
चर्चा आहे की, बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्यासाठी अनुषाला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली आहे. अशा स्थितीत चर्चा तीव्र होत आहे की, अनुषा आणि करण पुन्हा बिग बॉसच्या घरात भेटले तर काय होईल? प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहणे मनोरंजक असेल. अनुषाने करणवर फसवणुकीचा आरोप केला होता. त्याचबरोबर घरात प्रवेश करण्यापूर्वी करणने स्पष्ट केले होते की, अनुषा जर शोचा भाग बनली तर तिला काहीच अडचण नाही.
पण आता या जोड्या एकत्र बिग बॉसच्या घरात कशा नांदणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.