'स्वागत‌ नही करोगे'....? 'दबंग ३' मध्ये‌‌ सलमानचा‌ नवा अंदाज

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने 'दबंग 3' चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. 

Updated: Apr 3, 2019, 01:07 PM IST
'स्वागत‌ नही करोगे'....? 'दबंग ३' मध्ये‌‌ सलमानचा‌ नवा अंदाज title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने 'दबंग 3' चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. सलमानने खुद्द याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. दबंग चित्रपटाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यात हे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले होते. चित्रपटातील गाण्यांनी तर चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली होती. चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्याची अधिकृत घोषणा सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Shooting for #dabangg3 on the beautiful ghats of Narmada

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

नर्मदा नदीच्या घाटावर 'दबंग 3' चित्रपटाच्या शुटिंगचा नारळ फोडण्यात आला आहे. सलमानने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये नर्मदा घाटावरील सौंदर्य टिपण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Day1dabangg3 arbaazkhanofficial prabhudheva nikhildwivedi25

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

  'दबंग-3' चित्रपटाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. चित्रपटात अभिनेता बॉबी देओल सलमानच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Back in our birthplace for Dabangg3 shoot arbaazkhanofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

याआधी सलमान आणि बॉबी 'रेस 3' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस आहे होते. सोनाक्षी सिन्हा सलमाच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 'दबंग-3' चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.