CONFIRMED : हो! हरलीनसोबतच्या नात्यात दुरावा, विकीकडून संकेत

सुरुवातीला विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपचीच फक्त चर्चाच होती. पण.... 

Updated: Apr 3, 2019, 12:11 PM IST
CONFIRMED : हो! हरलीनसोबतच्या नात्यात दुरावा, विकीकडून संकेत  title=

मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशलने प्रेक्षकांच्या मनावर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवल्याचं पाहायला मिळालं. २०१९ या वर्षाचीय दणक्यात सुरुवात करणारा विकी हा त्याच्या चित्रपटासोबतच खासगी आयुष्यामुळेही तितकाच चर्चेत आला. विकी चर्चेत येण्यास निमित्त ठरलं ते म्हणजे हरलीन सेठी हिच्यासोबतचं त्याचं नातं. हरलीन आणि विकीच्या रिलेशनशिपच्या निमित्ताने हिंदी कलाविश्वात आणखी एका सेलिब्रिटी जोडीची भर पडली अशा चर्चा रंगत नाहीत तोच या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली. 

सुरुवातीला विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपचीच फक्त चर्चाच होती. हरलीनने इइन्स्टाग्रामवर विकीला अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना आणखी चालना मिळाली. पण, त्यानंतर ही बाब आणखी जास्त स्पष्ट झाली, जेव्हा खुद्द विकीनेच आपण सिंगल असल्याचं 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. तू सध्याच्या घडीला सिंगल आहेस का? असा प्रश्न ज्यावेळी विकीला या मुलाखतीत विचारण्यात आला, तेव्हा विकीने दिलेल्या उत्तराने हरलीनसोबतचं त्याचं नेमकं नातं स्पष्ट झालं. 'हो हो.... सध्या मी सिंगलच आहे... पाह... अगदी एकटा'. त्याने 'एकटा' हा शब्द वारंवार उच्चारला. त्यामुळे विकी सध्या कोणासोबकतचही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट होत आहे. इतकच नव्हे तर, आपण 'मिंगल' होण्यासाठी तयार आहोत, पण अर्थातच प्रेक्षकांसोबत असं म्हणत त्याने या उत्तराला वेगळं वळण दिलं. 

विकी आणि हरलीनच्या नात्याच्या चर्चा या काही कार्यक्रमांच्याच निमित्ताने झाल्या होत्या, जेथे 'उरी' फेम या अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीविषयी काही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. हरलीनसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर विकी अभिनेत्री कतरिना कैफ हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. इतकच नव्हे तर, भूमी पेडणेकरशी त्याची वाढती जवळीकही बऱ्याच चर्चांना वाव देत आहे. तेव्हा आता विकीची साथ नेमकं कोण देणार आणि कोणासोबत तो 'मिंगल' होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.