अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिषेक-आराध्याच्या खास गोष्टीचा खुलासा

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गेम शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये एका स्पर्धकासमोर खुलासा केला.

Updated: Sep 23, 2021, 11:57 AM IST
अमिताभ बच्चन यांच्याकडून अभिषेक-आराध्याच्या खास गोष्टीचा खुलासा

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गेम शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये एका स्पर्धकासमोर खुलासा केला. ज्यामध्ये त्यांनी आपला मुलगा अभिषेक आणि नात आराध्याकडून कोणत्या विशेष भेटवस्तू मिळाल्या हे सांगितले.

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या गेम शो 'कौन बनेगा करोडपती 13' मध्ये दिसत आहेत. KBC शो मध्ये जेथे स्पर्धक त्यांच्या संबंधित गोष्टी अमिताभ बच्चन यांना सांगतात. त्याचबरोबर अमिताभ बच्चन स्वतःशी आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित मनोरंजक गोष्टीही शेअर करतात. अलीकडेच त्यांनी खुलासा केला की त्यांना त्यांचा मुलगा अभिषेक आणि नात आराध्याकडून कोणत्या विशेष भेटवस्तू मिळाल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर, अलीकडेच, शो दरम्यान, एका स्पर्धकाने बोलताना अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांचे कौतुक केले, त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या समोर आपल्या इंद्रधनुष्याच्या जॅकेटबद्दल खुलासा केला. अमिताभ यांनी सांगितले की, हे जॅकेट त्यांना अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून दिले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ बच्चन अलीकडेच 'चेहरे' चित्रपटात दिसले होते, ज्यात इमरान हाश्मी त्यांच्यासोबत दिसला होता. अमिताभ बच्चन आता नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'मध्ये दिसतील. याशिवाय ते 'मेदे', 'ब्रह्मास्त्र', 'गुड बाय' सारख्या चित्रपटांमध्येही काम करत आहेत. यानंतर, 'द इंटर्न' चित्रपटाचे शूटिंगही सुरु करतील.