नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार?, या कारणामुळे खिलाडीची निवड

प्रत्येकजण सोशल मीडियावर नीरजचा विजय साजरा करत आहे. पण या दरम्यान अक्षय कुमारचे नाव देखील अचानक ट्रेंडींगला आले आहे. 

Updated: Aug 8, 2021, 03:45 PM IST
 नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार?, या कारणामुळे खिलाडीची निवड

मुंबई : भाला फेकणारा एथलीट नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण देशाला नीरजच्या विजयाचा अभिमान आहे. एथलेटिक्समध्ये भारताचे हे 100 हून अधिक वर्षांचे पहिले पदक आहे.

प्रत्येकजण सोशल मीडियावर नीरजचा विजय साजरा करत आहे. पण या दरम्यान अक्षय कुमारचे नाव देखील अचानक ट्रेंडींगला आले आहे. दरम्यान काही ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात अक्षय कुमारने नीरजच्या बायोपिकचे हक्क विकत घेतल्याचं सांगण्यात आलंय.

बायोपिकची तयारी सुरु

बायोपिकची तयारी सुरु असं म्हणत नेटकऱ्यांनी अक्षयचा एका सिनेमातील फोटो शेअर केला आहे. ज्यानंतर अक्षय नीरज चोप्रावर आधारित बायोपिक करत असल्याच्या चर्चांना आणखीनंच उधाण आलं. या फोटोत अक्षयच्या हातात भाला दिसून येत आहे. 

यानंतर, अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत ज्यात असे म्हटले जात आहे की अक्षय आता नीरजचा बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. नीरज किंवा अक्षय कुमार या दोघांनीही अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.याबाबत फक्त फॅन्स सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.

अक्षयचे नाव का पुढे आले

अक्षय वास्तविक जीवनातील कथांवर आधारित चित्रपट बनवतो आणि विशेषतः जे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. याच कारणामुळे नीरजच्या बायोपिकसाठीही चाहत्यांनी अक्षयचे नाव घ्यायला सुरुवात केली.

अक्षय इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त

सध्या अक्षय त्याच्या आगामी 'बेल बॉटम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. बेल बॉटमची कथा सप्टेंबर 1981 ते ऑगस्ट 1984 नंतर अपहरण करण्यावर आधारित आहे.

अक्षय कुमार व्यतिरिक्त हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि वाणी कपूर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी 3 डी मध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल. कोविडनंतर हा अक्षयचा पहिला चित्रपट आहे जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चाहत्यांना मोठ्या पडद्यावर अक्षयला पाहण्यासाठी उत्सुकता आहे.