'रूपेरी पडद्यावर Sunny Leoneचे चित्रपट म्हणजे... ' असं का म्हणाले मुकेश भट्ट

मुकेश भट्ट अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले.

Updated: Jun 5, 2021, 08:52 AM IST
'रूपेरी पडद्यावर Sunny Leoneचे चित्रपट म्हणजे... ' असं का म्हणाले मुकेश भट्ट  title=

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांमध्ये मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) यांचं नाव अव्वल स्थानी आहे. ते एक यशस्वी निर्माते म्हणून ओळखीस आले पण मुकेश भट्ट अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले. मुकेश भट्ट अत्यंत साधे आहेत. पण त्याच्या वक्तव्यांमुळे ते कायम वादाच्या भोवऱ्यात अडकले. 2018साली त्यांनी विचित्र विधान केले. 2018साली सर्वोच्च न्यायालयाने सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य केले, तेव्हा चित्रपट निर्माते मुकेश भट्ट म्हणाले की, राष्ट्रगीताचे पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.

मुकेश भटट्ट म्हणाले, 'मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो. जर सिनेमागृहांमध्ये अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) चा चित्रपट असेल तर, तेव्हा त्याठिकाणी राष्ट्रगीत योग्य आहे?' त्यांचं हे विधान तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. मुकेश भटट्ट यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 1990 साली प्रदर्शित झालेल्या 'जुर्म' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही. त्यनंतर भट्ट यांनी 'आशिकी' चित्रपटात काम केलं 'आशिकी' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यवर घेतलं. मुकेश भट्ट हे महेश भट्ट यांचे बंधू आहेत. महेश भट्ट यांनी 'जिस्म 2' चित्रपटाच्या माध्यमातून सनीला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 

सनी  सध्या केरळमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी गेली आहे. त्याचबरोबर ती काही शो देखील शूट करत आहे. सनी कायम सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील घडामोडींची माहिती देते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. पण सनी लिओनीने हा व्हीडिओ तरी शेअर करायला नको होता.