प्रत्येक तरुणाला एक कोटी आणि मुलींना सोन्याचे दागिने; अपक्ष उमेदवाराचं भन्नाट घोषणापत्र चर्चेत

तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने असे काही आश्वासनं लोकांना दिले आहेत, की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.

Updated: Apr 1, 2021, 01:33 PM IST
प्रत्येक तरुणाला एक कोटी आणि मुलींना सोन्याचे दागिने; अपक्ष उमेदवाराचं भन्नाट घोषणापत्र चर्चेत  title=

 Viral News : तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने असे काही आश्वासनं लोकांना दिले आहेत, की ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. अपक्ष उमेदवार थुलम सर्वानन यांनी लोकांना एक मिनी हेलिकॉप्टर, प्रत्येक घरी एक एक कोटी रुपये, लग्नांमध्ये सोन्याचे दागिने, तीन मजली घर आदी देण्याचं आश्वासन दिलं आहे. 

 एवढ्यावर ते थांबले नाहीत तर, आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी त्यांनी थेट चंद्राची सफर घडवून आणण्याचेही आश्वासन दिले आहे.
 
 थुलन सर्वानन हे अपक्ष उमेदवार आहेत. जो तामिळनाडूच्या मदुरै दक्षिण येथील जागेवर निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या घोषणापत्राने सर्वांचं लक्ष आकर्षित केलं आहे. 
 
अरूण बोथरा यांनी या बातमीचा फोटो ट्विट केला आहे. त्याचे कॅप्शन देताना त्यांनी म्हटले आहे की, मुझे इस उम्मीदवार मे एक अलग स्तर की ईमानदारी दिखती है.

 
 33 वर्षीय पत्रकारापासून निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या राजकारणात उतरलेल्या थुलम सर्वानन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, 'माझा उद्देश हा आहे की, राजकीय पक्षांच्या फुकट आश्वासनांमध्ये लोकांनी फसू नये. त्याबाबत त्यांच्यात जागृती वाढावी. मला वाटते की, लोकांनी अशा उमेदवारांना निवडावं जे विनम्र आहेत'.
 
 खरंतर, थुलन आपल्या गरिब आईवडीलांसोबत राहतात. उमेदवारीच्या अर्जासाठी लागणारे 20 हजार रुपये त्यांनी उधार घेतले आहेत. परंतु त्यांच्या  घोषणापत्राने इतर राजकीय पक्षांना चक्राऊन टाकले आहे. 
 
 'निवडणूका झाल्यानंतर नेते लोककल्याणाचे काम करीत नाहीत, रोजगारावर लक्ष देत नाहीत, स्वच्छ हवा मिळावी यासाठी काम करीत नाहीत, शेती आणि इतर उद्योगांच्या प्रगतीकडे लक्ष देत नाहीत. फक्त निवडणुकीच्या आधी मोठमोठ्या आश्वासनांनी मतदारांना फसवतात. पैशाची लालूच दाखवल्याने तेही फसतात'. या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचे थुलन यांचा हेतू आहे 
 

 

सर्वानन यांनी केलेल्या घोषणा

  •  प्रत्येक मतदात्याला आयफोन 
  •  20 लाखापर्यंत कार आणि छोटे हॅलिकॉप्टर
  •  परिसर थंड ठेवण्यासाठी 300 फुट उंच बर्फाचा डोंगर
  •  प्रत्येक तरुणाला उद्योग सुरू करण्यासाठी 1 कोटी रुपये
  •  चंद्रावर फिरण्यासाठी 100 दिवसांची सुट्टी
  •  तीन मजली घर, सोबत स्विमिंग पूल
  •  प्रत्येक मुलीच्या लग्नात 800 ग्रॅम