close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं  शुक्रवारी निधन झालं. 

Updated: Aug 1, 2017, 06:38 PM IST
इंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल

मुंबई : बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं  शुक्रवारी निधन झालं. पण इंदर कुमारला त्याच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंदर कुमारनं मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी २७ जुलैला इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर पिस म्हणजेच शांतता असं कॅप्शन इंदर कुमारनं दिलं होतं.

वीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केला. त्यांच्या कारकिर्दीतले बरेचसे रोल हे साईड अॅक्टरचे होते.

तिरछी टोपीवाले, कही प्यार न हो जाए, पेईंग गेस्ट, वॉण्टेड यासारख्या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकांचं कौतुक झालं होतं. क्योंकी सांस भी कभी बहु थी या मालिकेतलं मिहीर विरानी हे पात्र चांगलंच गाजलं होतं. सलमान खान आणि कुटुंबीयांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. सलमानसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत कामही केलं होतं. 

इंदर कुमारची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट

 

Peace....

A post shared by Indra Kumar (@inderkumarrocks) on