मुंबई : 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे. ही यादी फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी असल्याचं म्हटलं आहे.
यात अभिनेता सलमान खानने पहिल्या स्थानी आहे, मागील वर्षी देखील तो पहिल्या स्थानी होता. 51 वर्षीय सलमान खानचं वार्षिक उत्पन्न 232.83 कोटीआहे. तो सेलिब्रिटी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.
सलमान कमाईमध्ये अव्वल ठरला आहे, जरी यंदा रिलीज झालेला ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा चालला नाही, तरीही .
दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे. फोर्ब्सच्या या यादीत पहिले तीन सेलिब्रिटी हे यंदाही कायम आहेत.
कोहली नंबर तीन, सचिन पाच, धोनी आठ नंबरवर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोहलीची वार्षिक कमाई 100.72 कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे.
4) अभिनेता अक्षय कुमार 98.25 कोटी,
5) सचिन तेंडुलकर 82.50 कोटी,
6) आमीर खान 68.75 कोटी
7) प्रियांका चोप्रा 68 कोटी,
8) महेंद्रसिंह धोनी 63.77 कोटी
9) हृतिक रोशन 63.12 कोटी
10) अभिनेता रणवीर सिंह 62.63 कोटी
दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवलं आहे. शाहरुख 170.50 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.