विराटने अनुष्कासाठी लिहीली ‘ही’ सुरेख पोस्ट

अनुष्का आणि विराटच्या नात्याने नेहमीच चाहत्यांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं आहे.

Updated: Sep 26, 2018, 10:10 PM IST
विराटने अनुष्कासाठी लिहीली ‘ही’ सुरेख पोस्ट  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात अतिशय कमी कालावधीत आपल्या खेळाच्या बळावर वरचं स्थान मिळवणाऱ्या विराट कोहलीला नुकतंच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी त्याच्या चाहत्यांमध्ये तर आनंदाची लाट पाहायला मिळालीच. पण, त्यासोबतच सर्वाधिक आनंद झाला तो म्हणजे त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला.

अनुष्का आणि विराटच्या नात्याने नेहमीच चाहत्यांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं आहे. कठिण प्रसंगांमध्येही त्यांचं एकमेकांच्या पाठिशी उभं राहणं आणि एकमेकांना साथ देणं हीच बाब या ‘विरुष्का’च्या नात्याला अधिकच खास बनवते.

अनुष्काला विराटने सर्वच बाबतीत नेहमीच अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे त्याने तिच्यासाठी लिहिलेली पोस्ट.

‘अनेक अडथळे येऊनही ज्या व्यक्तीने मला पुढे जाण्यास प्रेरणा दिली. मला मार्गदर्शन केलं. नकारात्मक गोष्टींशी लढा देण्यासाठी ताकद दिली, माझ्यात पुरता बदल घडवून आणला आणि प्रेमाची खरी अनुभूती मला करुन दिली अशी ती व्यक्ती... माझी ताकद.... माझी आयुष्यभराची साथीदार..’, असं त्याने अनुष्काचा सुरेख असा फोटो पोस्ट करत लिहिलं.

विराटची ही पोस्ट अनेकांची मनं जिंकून गेलीच. पण, ज्या व्यक्तीसाठी त्याने ही पोस्ट लिहिली होती, त्या व्यक्तीचं म्हणजेच अनुष्काचंही मन त्याने जिंकलं असणार यात शंका नाही.