'विरुष्का'ची एक्सटेंडेड फॅमिली पाहिली का?

नव्या वर्षाच्या निमित्ताने पाहायला मिळाला सेलिब्रिटी जोडीचा ग्लॅमरस अंदाज   

Updated: Jan 1, 2020, 02:37 PM IST
'विरुष्का'ची एक्सटेंडेड फॅमिली पाहिली का?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : चित्रपट, जाहिराती, विविध कार्यक्रम अशा व्यग्र वेळापत्रकातून अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने वेळ काढत नव्या वर्षाची सुरुवातच एका खास व्यक्तीसोबत केली आहे. ही खास व्यक्ती म्हणजे अर्थातच तिचा पती, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. 

काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का हे स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. नाताळच्या सेलिब्रेशनपासून ते नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंतचा काळ या जोडीने अतिशय सुरेखपणे व्यतीत केला. त्यांच्या या खास क्षणांना आणखी खास केलं ते म्हणजे अभिनेत्री करिना कपूर खान, तिचा पती अभिनेता सैफ अली खान, अभिनेता वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल. 

स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या या सर्व मंडळींनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोमध्ये परदेशात त्यांची भेट घडून आल्याचं लक्षात आलं. मुख्य म्हणजे नव्या वर्षाची सुरुवातही या मंडळींनी एकत्रच केली. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यावेळचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सैफ, अनुष्का, वरुण, नताशा, करीना आणि विराट ही सर्व मंडळी एका कौटुंबीक फोटोमध्ये पोझ द्यावी असे बसल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

थोडक्यात परदेशात तयार झालेल्या विरुष्काच्या या विस्तारित कुटुंबाचीच खऱ्या अर्थाने तेथे चर्चा झाली, असं म्हणायला हरकत नाही. फोटोपुरसताच न थांबता या मंडळींचा एक व्हिडिओसुद्धा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये ते नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.