केदारनाथविषयी ही गोष्ट माहितीये?

सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपुत जोडी भेटीला 

केदारनाथविषयी ही गोष्ट माहितीये?

मुंबई : रोनी स्क्रूवाला यांचा आगामी सिनेमा 'केदारनाथ' हा जगातील सर्वात मोठ्या महाप्रलयावर आधारित सिनेमा आहे. 2013 मध्ये जून महिन्यात आलेल्या महाप्रलयाने सगळं नष्ट झालं. आणि ईश्वराच्या या भूमीवर असा प्रकोप पाहायला मिळाला ज्याची कुणी कल्पनाच केली नव्हती. 

केदारनाथ या सिनेमात या महाप्रलयाचं चित्रण मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. या महाप्रलयावर चित्रीत केलेला हा पहिला सिनेमा आहे. सिनेमातील अनेक दृष्य हे पाण्यात चित्रीत केले आहेत जे बघून आपल्याच अंगावर काटा येईल. 

केदारनाथच्या धरतीवर चित्रीत झालेली ही एक प्रेमकहाणी आहे. या सिनेमात प्रेम, धर्म, जुनून आणि आध्यात्मिकता यावर आधारीत हा सिनेमा आहे. 2013 मधील महाप्रलयावर आधारित सिनेमावर आधारित हा सिनेमा आहे. 

सिनेमाचा टीझर, ट्रेलर आणि रिलीज झालेल्या गाण्यातून सिनेमाची मुख्य जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. या सिनेमातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच सुशांत सिंह राजपूतने 2013 मध्ये आलेल्या काई पो चे या सिनेमात रोनी स्क्रूवाला आणि अभिषेक कपूरसोबत काम केलं आहे.

केदारनाथमधून सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत  हा सिनेमा 7 डिसेंबर 2018 रोजी रिलीज होणार आहे.