Wardrobe Malfunction चा सामना करणाऱ्या 'तिचं', मलायकाकडून कौतुक

पाहा हा व्हिडिओ 

Wardrobe    Malfunction चा सामना करणाऱ्या 'तिचं', मलायकाकडून कौतुक  title=

मुंबई : रिअॅलिटी टीव्ही शो 'इंडिया नेक्स्ट टॉप मॉडेल 4' च्या एका स्पर्धकाचं मलायका अरोराने भरभरून कौतुक केलं आहे. या स्पर्धेतील स्पर्धक तमन्ना शर्मा हिच्यासोबत परफॉर्मन्स करताना एक असा प्रकार घडला ज्यामुळे सगळेच थक्क झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या शोमध्ये तमन्ना परफॉर्म करताना तिच्या ब्लाऊजचे मागचे हूक तुटले आणि हा ब्लाऊज तिच्या अंगावरून खाली पडत होता. या दरम्यान तमन्ना न घाबकता एका हाताने ब्लाऊज पकडून तिने तिचा तो परफॉर्मन्स पूर्ण केला. तमन्नाने 'गब्बर' या सिनेमातील 'कुंडी मत खडकाओ राजा' या गाण्यावर डान्स केला.  

मलायकाने शेअर केला फोटो तमन्ना स्टेजवर ज्या पद्धतीने वागली त्याचं मलायकाला अतिशय कौतुक आहे. तिने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मलायका तिला म्हणते की, तू खूप चांगल्याप्रकारे परिस्थिती सांभाळलीस. जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा याच गोष्टीची भीति असते की, कधी वार्डरोब मालफंक्शन तर नाही ना होणार. तू ही परिस्थिती खूप छान सांभाळलीस