'इंदु की जवानी' आणि 'देवी' चित्रपटाच्या निर्मात्याचं कोरोनामुळे निधन

कलाविश्वावर देखील कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे.

Updated: May 29, 2021, 04:33 PM IST
'इंदु की जवानी' आणि 'देवी' चित्रपटाच्या निर्मात्याचं कोरोनामुळे निधन title=

मुंबई : कलाविश्वावर देखील कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत, तर अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 'इंदु की जवानी' आणि 'देवी' चित्रपटाचे निर्माते रेयान स्टीफन (Ryan Stephen) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती ‘द फॅमिली मॅन' सीरिजचे  रायटर आणि निर्माते सुपर्ण एस वर्मा यांनी दिली आहे. 

रेयान स्टीफन यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री  कियारा आडवाणी पासून ते अभिनेता वरुण धवनपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. 

अभिनेत्री दिया मिर्झा ट्विट करत म्हणाली, 'फार दुःख होतं आहे. मी ओळखत असलेल्या व्यक्तींपैकी रेयान एक होते.' रेयान बॉलिवूडमध्ये गेल्य दोन दशकांपासून काम करत होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे  कलाविश्वाला आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.