VIDEO: पाहा 'स्टुडण्ट ऑफ...' फेम सिद्धार्थ मल्होत्राचं घर

सिद्धार्थच्या घराचे अंतरंग 

Updated: Nov 6, 2018, 12:37 PM IST
VIDEO: पाहा 'स्टुडण्ट ऑफ...' फेम सिद्धार्थ मल्होत्राचं घर  title=

मुंबई : रोजच्या आयुष्यात घाई-गडबड आणि गोंधळ असला तरीही  या साऱ्या वातावरणात एक गोष्ट मात्र प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. किंबहुना त्याच एका गोष्टीसोबत निवांत क्षण व्य़तीत करण्याची अनेकांची इच्छा असते. प्रत्येकालाच हवीहवीशी वाटणारी ही गोष्ट, वस्तू नव्हे तर वास्तू म्हणजे स्वत:चं घर. 

घर हे प्रत्येकासाठीच किती खास असतं हे सांगता येणं अशक्य. अशा या सुरेख वास्तूचं सौंदर्य वाढवण्यासाठी मग त्याला सुशोभित करण्यात येतं. कला आणि नव्या संकल्पना यांची संगड घालत आजवर अनेकांनीच घरांचं सुशोभिकरण केलं आहे. 

बॉलिवूड कलाकारही यात मागे नाहीत. नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानेही त्याच्या घराची सुरेख सजावट करुन घेतली आहे. 

किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या पत्नीने त्याचं घर सजवलं असून, सिडने तिचे आभारही मानले आहेत. 

गौरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थच्या घराचे अंतरंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. घरात प्रवेश करण्यापासून ते त्यातील बार सेक्शन, ड्रॉइंग रुम, डायनिंग एरिया आणि हवीहवीशी वाटणारी गॅलरी अशा प्रत्येक ठिकाणाची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सुरेख अशा रंगांचा वापर करत गौरीने सिद्धार्थच्या घराची सजावट केली आहे. ज्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कलाकार मंडळींच्या घरी जाता येत नसलं किंवा अनेकदा ते अशक्य असलं तरीही या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र आपण त्यांच्या घरात डोकावू शकतो, हेसुद्धा तितकंच खरं.