मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना आणि 'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असणारा 'बधाई हो' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मुख्य म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर, पाकिस्तानातही सध्या हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. पाकिस्तानमध्येही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तेथे 2,10,63,765 कोटी रुपये म्हणजेट २८९ डॉलर इतकी कमाई केली आहे.
शेजारी राष्ट्रात आयुषमानच्या या चित्रपटाची कामगिरी पाहून पाकिस्तानही बधाई हो, असंच म्हणत असल्याची प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली आहे.
कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथेही हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, आता त्याच्या एकूण कमाईचे आकडे १०० कोटींच्या पलीकडे पोहोचले आहेत.
#BadhaaiHo is a MASSIVE HIT Overseas... Has fared exceptionally well in international markets... Total after Weekend 3 [till 4 Nov 2018]: $ 5.35 million [₹ 39.09 cr]... Key markets:
USA-Canada: $ 2.516 mn
UAE-GCC: $ 1.262 mn
UK: $ 368k
Aus: $ 444k
NZ: $ 114k
Pakistan: $ 289k— taran adarsh (@taran_adarsh) November 5, 2018
चित्रपटाच्या वाट्याला आलेलं यश पाहून अभिनेता आयुषमान खुराना याने या साऱ्याचं श्रेय चित्रपटाच्या पटकथेला दिलं आहे.
आयुषमान आणि सान्याव्यतिरिक्त या चित्रपटात नीना गुप्ता, सुरेखा सिकरी, गजराज राव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या कलाकारांचा अभिनय, पटकथेत असणारी ताकड या साऱ्याच्याच बळावर बधाई होच्या वाट्याला हे यश आलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.