मुंबई : टी 20चा महाकुंभ समजलं जाणार्या आयपीएचं यंदा 11 वं आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 वे पर्व रंगणार आहे. परंतू दरवर्षी आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळादेखील रंगतो. आयपीएलच्या 11 व्या पर्वामध्येही अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
'पद्मावती' चित्रपटातील उल्लेखनीय कामानंतर सध्या सर्वत्र 'रणवीर सिंह'ची चर्चा आहे. यंदाच्या आयपीएल सीझनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रणवीर सिंह 15 मिनिटांचा खास परफॉर्ममन्स सादर करणार होता. त्यासाठी 5 कोटीचं मानधन मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं होते. परंतू आता आगामी ओपनिंग सोहळ्यात रणवीर झळकणार नसल्याची चर्चा आहे.
एका फूटबॉलमॅचमध्ये खेळताना रणवीर सिंहला इजा झाली. यामुळे डॉक्टरांनी रणवीरला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डांससारख्या शरीराला थकवणार्या अॅक्टिव्हिटींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रणवीर झळकणार नसला तरीही 'गली बॉय' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मात्र रणवीर पुन्हा रूजू होणार आहे.
अभिनेता रणवीर सिंह आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये झळकणार नसला तरीही त्याच्याऐवजी दुसरा एखादा सेलिब्रिटी दिसणार असल्याची शक्यता आहे.
रणवीर सिंहऐवजी अभिनेता ऋतिक रोशन झळकण्याची शक्यता आहे. 2015 साली ऋतिक आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये झळकला होता.
यंदाच्या आयपीएल सीझनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस, परिणीती चोप्रा झळकणार आहे. वरूण धवनने या सोहळ्यासाठी 6 कोटी मानधन घेतल्याचे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे.