Ira Khan कडून बोल्ड फोटो शेअर, पण एक गोष्ट मात्र ब्लर

फोटोमध्ये छोटी गोष्ट ब्लर करण्याची वेळ का आली आयरा खानवर?

Updated: Jul 27, 2021, 07:05 AM IST
Ira Khan कडून बोल्ड फोटो शेअर, पण एक गोष्ट मात्र ब्लर

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून नावाजलेला अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे किंवा समाज कार्यामुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. किरण राव आणि आमिरचं घटस्फोट तर दुसरं कारण म्हणजे त्याची मुलगी आयरा खान. आयरा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. शिवाय ती सतत तिच्या बॉयफ्रेन्डसोबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

त्यामुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. आता देखील आयराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमध्ये आयराने एक गोष्ट ब्लर केली आहे. फोटोमध्ये आयरा एका बाकावर बसली आहे. तिच्या हातात एक श्वान आहे. फोटो अत्यंत बोल्ड असून तिने डेनिम शर्ट घातलं. पण बाजूला असलेला छोटा बॉक्स आयराने ब्लर केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

या फोटोवर युझर्सच्या कमेन्ट येत आहे. कमेन्ट बॉक्समध्ये आयराने ब्लर केलेला बॉस्क सिगारेटचा असल्याचं म्हटलं जात आहे. काहींनी आरयाला या फोटोमुळे ट्रोल केलं आहे तर काहींनी मात्र  तिच्या या फोटोला पसंती दर्शिविली आहे. सांगायचं झालं तर आयरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे देखील ट्रोल होत असते. तिच्या बॉयफ्रेन्डचं नाव नूपुर शिखारे आहे. 

कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.