मुंबई : शराफत की दुनिया का किस्सा ही खत्म, अब जैसी दुनिया वैसे हम.... बोलायला हा तर फक्त एक डायलॉग आहे. पण ज्यापद्धतीने इरफान खानने याला म्हटलंय त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करून गेलाय. इरफानमध्ये जी प्रतिभा होती त्याला कोणत्या अवॉर्डची गरज नाही. त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक कलागुणांनी परिचित आहेत.
29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानचं निधन झालं. बॉलिवूड आणि इरफानच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण या दिवसी सिनेसृष्टीने उत्कृष्ठ कलाकार गमावला आहे. इरफान खानच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच बाबिल आणि सुतापा यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी इरफान खान यांच्या आजाराची अडीच वर्षे नेमके कसे होते ते सांगितलं आहे.
इरफान खानची पत्नी सुतापा अजून हे दुःख विसरू शकलेली नाही. सुतापा म्हणते की,'आम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतोय. एक वर्ष झालंय, पण मी अजूनही लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाही. लोकांना भेटण्यापेक्षा मला लिहिण्यात रमायला आवडतं.'
बाबिल जेव्हा पण वडिलांबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. एका मुलाखतीत त्याने वडिलांना गमावण्याचं दुःख काय असतं ते व्यक्त केलं होतं. बाबिल म्हणतो की,'मी एका सुरक्षित वर्तुळात जगत होतो. इरफानचा मुलगा बनून पण ते वर्तुळ एक दिवस तुटलं. तेव्हा तुमच्याजवळ काही पर्याय राहत नाही. मग तुम्हाला तेच करावं लागतं ते आयुष्याला वाटतं असतं. आणि हेच खरं आहे.'
आजाराशी लढताना इरफान काही प्रमाणात बरे देखील झाले होते, असं बाबिल सांगतो. तसेच सुतापा सांगते की, इरफानला त्याचा मृत्यू आणि त्यानंतरच आयुष्य याबद्दल खूप उत्सुकता होती. बाबिल म्हणतो की, इरफानने मृत्यू समोर शरणागती पत्करली होती.
इरफानच्या मृत्यूच्या दोन दिवसांपासूनच तो रूग्णालयात होता. त्याच भान हरवत चाललं होतं. इरफानने बाबिलकडे पाहिलं आणि तो हसत म्हणाला की,'मी मरणार आहे.' तेव्हा बाबिलने म्हटलं की,'मी म्हटलं असं काही होणार नाही. ते पुन्हा हसले आणि झोपून गेले.' इरफानचं असं जाणं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.