'सीटी मार'च्या शूट दरम्यान पडला सलमान, दिशाने वाचवलं, पहा BTS व्हिडिओ

दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्रामवर बीटीएसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Apr 28, 2021, 09:45 PM IST
'सीटी मार'च्या शूट दरम्यान पडला सलमान, दिशाने वाचवलं, पहा BTS व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेला 'राधे: मोस्ट वॉन्टेड भाई'चा ट्रेलर 22 एप्रिलला रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं . यानंतर आता या सिनेमातील 'सीटी मार' हे पहिलं गाणंही रिलीज झालं आहे. या गाण्याची चाहते आतुरतेने वाट देखील पाहत होते.

हे गाणं रिलीज होताच युट्यूब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्रामवर बीटीएसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

राधेच्या निर्मात्यांनी देखाल  या गाण्याचा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या सेटवर या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलं. तो सेट एक भव्यदिव्य दिसत आहे. हे गाणं शूट करण्यासाठी निर्मात्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. मात्र हे गाणं शूट करताना सगळ्यांनीच भरपूर धमाल देखील केली. या गाण्यातील हुक स्टेप बरीच व्हायरल होत आहे. याआधी सलमानच्या हुक स्टेप बऱ्याचदा व्हायरल झाल्या आहेत. दिशाच्या सांगण्यानुसार सलमानला त्याच्या काही डान्स स्टेप शिकायला खूप मेहनत घ्यावी लागली. मात्र दिशाने आपल्या स्टेप्स ईझीली शिकून घेतल्या. या शूटदरम्यान सलमानचा तोल गेला आणि तो पडला तितक्यात दिशा सल्लूला पकडते यांचा हा बीटीएस व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो.

अभिनेत्री दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने इंस्टा स्टोरीवर शेअर करत लिहिलं आहे की, “काही बीटीएस व्हिडिओ सिटी मार”. या बीटीएस व्हिडिओमध्ये दिशा ब्लॅक आऊटफिटमध्ये  दिसली आहे आणि सिटी मार गाण्यांवर नाचताना दिसत आहे. या गाण्यात सलमान खान आणि दिशा पाटनीची केमिस्ट्री तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

सीटी मार' हे गाणे सन २०१७ मध्ये दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या तेलगू चित्रपटाच्या सुपरहिट गाणं सीटी मारचं रिमेक  आहे. 'सीटी मारा' या गाण्याचं संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. हे गाणे कमल खान आणि युलिया वंतूर यांनी गायले आहे.

हा चित्रपट थिएटर आणि ओटीटीवर प्रदर्शित होईल
काही दिवसांपूर्वी सलमान खानने आपल्या 'राधे' या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे.  हा सिनेमा ईदच्या दिवशी १३ मेला झी5 सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, या सिनेमात सलमान खान, दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ, रणदिप हुड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.