वडिलांच्या आठवणीत बाबिलने शेअर केला व्हिडिओ

'साहबजादा' इरफान खान...    

Updated: May 2, 2020, 05:16 PM IST
वडिलांच्या आठवणीत बाबिलने शेअर केला व्हिडिओ

मुंबई : अभिनेता इरफान खान यांच्या निधनाची बातमी कळताच कलाविश्वासोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कर्करोगामुळे इरफान खान यांच निधन झालं. छोटा पडदा, बॉलिवूड आणि नंतर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख इरफान खान यांनी निर्माण केली होती. आता सोशल मीडियावर त्यांचे कधी न प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. फक्त चाहतेच नाही तर त्यांच्या मुलाने देखील वडिलांच्या आठवणीत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. 

इरफान खान यांचा मुलगा बाबिलने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'जेव्हा तुम्ही मोठ्या कालावधीसाठी डायटवर असायचे आणि शुटींग संपल्यानंतर तुम्ही पानी पुरी खायचे' असं लिहलं आहे. व्हिडिओमध्ये इरफान पानीपुरी खाताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When you’re on diet for so long and then the shoot ends and you can have pani puri.

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

कर्करोगाच्या आजाराशी झुंज देणारा जीवनाशी खऱ्या अर्थाने दोन हात करणारे हे लढवैय्ये इरफान आज आपल्यात नाहीत. पण, त्यांचं अस्तित्वं मात्र कायम सर्वांमध्येच राहणार आहे. 

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.