यापुढे भाऊ कदम खळखळून हसवणार नाही? कारण...

भाऊ कदमचा एक फोटो समोर आला आहे.

Updated: Dec 27, 2021, 06:20 PM IST
 यापुढे भाऊ कदम खळखळून हसवणार नाही? कारण... title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला भाऊ कदम सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत असतो. भाऊ कदमच्या विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे. त्याने मंचावर एन्ट्री घेताच प्रेक्षक टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. 

चला हवा येऊ द्याची संपुर्ण टीम सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण भाऊ कदमचा सध्या समोर आलेला फोटो पाहून सगळेच चकीत झाले आहेत. तर काहींना याबाबत प्रश्न पडत आहेत. भाऊ कदमने अभिनय करणं सोडून दिलयं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याने प्रोफेशन बदलून नवा व्यवसाय सुरु केलाये की काय असं ही अनेकांना वाटत आहे. 

I Miss Shooting For Chala Hawa Yeu Dya, Reveals Bhau Kadam; Shares His  Lockdown Routine - Zee5 News

भाऊ कदमचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तो हेअर कटींग करताना दिसत आहे. हा फोटो सलूनमधील आहे. त्यामुळे भाऊ कदम आता हे काय करत आहे असं सगळ्यांनाच वाटत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भाऊ कदमचा हा फोटो सध्या सगळ्याचंच लक्षवेधत आहे. पण हा फोटो त्याच्या पांडू सिनेमाच्या वेळचा आहे. काही BTS व्हिडिओ आणि फोटो अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केले आहेत. कुशलने हा फोटो आपल्या इंस्टाग्रावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भाऊ कदम कुशल बद्रिकेचा हेअर कट करताना दिसत आहे. 

पांडूच्या गोष्टी असं म्हणत कुशलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गेली अनेक वर्ष मी आणी भाऊ एकत्र प्रवास करतो, पांडूच्या निमित्ताने आम्ही केस ही कापायला सोबत जाऊ लागलो, एकदा भाऊच लवकर आटपल तर पठ्ठ्याने चक्क माझे केस कापायला घेतले, नशीब !! प्रकरण फक्त फोटोवर निभावलं नाहीतर सिनेमात मी फार भयंकर दिसलो असतो आणि असा, भाऊने माझा "केसाने गळा कापला असता"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कुशल बद्रिके बऱ्याचदा धम्माल व्हिडिओ शेअर करताना दिसतो. त्याने पांडूच्या सेटवरील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो भाऊ कदमसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.