Drugs Case प्रकरणात अनन्याचा आधार बनतोय Rumoured बॉयफ्रेंड

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनन्याची होतेय चौकशी 

Updated: Oct 26, 2021, 02:56 PM IST
Drugs Case प्रकरणात अनन्याचा आधार बनतोय Rumoured बॉयफ्रेंड

मुंबई : आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) चं नाव समोर आलं आहे. ज्यानंतर एनसीबीने अनन्या पांडेची दोन वेळा चौकशी केली आहे. व्हॉट्सऍप चॅटमध्ये दोघं ड्रग्स संदर्भात चर्चा करत आहेत. अनन्याशी दोन वेळा चौकशी केल्यानंतर तिसऱ्यांदा 25 ऑक्टोबर रोजी सादर होण्यास सांगितले होते. मात्र ती एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली नाही. 

अनन्या सध्या खूप कठीण प्रसंगातून जात आहे. मात्र अशा वेळी अनन्याचा मित्र आणि तिचा rumored बॉयफ्रेंड ईशान खट्टर खंबीरपणे उभा आहे. आता या काळात तो अनन्याचा सपोर्ट बनला आहे.  शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी अभिनेता ईशान खट्टर रोडसाइड फ्लावर शॉपमधून फूल खरेदी करताना दिसला. ज्यानंतर एक तासाने त्याची कार अनन्या पांडेच्या घराबाहेर दिसली. 

ईशान देतोय अनन्याची साथ 

चंकी पांडेच्या कुटुंबातील एका जवळच्या मित्राने सांगितले की, ईशान अनन्याला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. ड्रग्ज प्रकरणात अनन्याचे नाव समोर आल्यापासून ईशान अनन्याच्या संपर्कात आहे. अनन्या आणि तिचे कुटुंब सुखरूप आहे याची काळजी घेत आहे. रिपोर्ट्सनुसार, ईशान अनन्या, तिचे कुटुंब आणि बहीण रईसा यांच्या खूप जवळ आहे.

आर्यन खान आणि अनन्या पांडेबद्दल बोलले तर त्याच्या कुटुंबालाही टार्गेट केले जाईल, असे चित्रपटसृष्टीतील अनेकांना वाटते. सोमवारी संजय गुप्ता यांनी कठीण काळात शाहरुख खानच्या कठीण प्रसंगात मौन पाळणं हे लाजिरवाणं असल्याचं म्हटल आहे.  संजयच्या ट्विटला उत्तर देताना निखिल द्विवेदी म्हणाले होते की, अनेकवेळा पाठिंबा दिल्याने अनेकांचा अहंकार दुखावला जातो आणि ते त्याला वेगळ्या पद्धतीने घेऊ लागतात आणि त्यांच्यात वाद होऊ शकते.